तालिबान्यांमुळे अफगाणिस्तानची परिस्थितीच नाही तर; येथील बाजार, लोकांच्या गरजा ही बदलल्या...

तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर केवळ तेथील परिस्थितीच बदलली नाही, तर तेथील बाजारपेठांमध्ये उपलब्ध वस्तूंपासून दुकानातील वस्तू देखील बदलल्या आहेत. 

Updated: Sep 3, 2021, 06:52 PM IST
तालिबान्यांमुळे अफगाणिस्तानची परिस्थितीच नाही तर; येथील बाजार, लोकांच्या गरजा ही बदलल्या... title=

काबूल : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर केवळ तेथील परिस्थितीच बदलली नाही, तर तेथील बाजारपेठांमध्ये उपलब्ध वस्तूंपासून दुकानातील वस्तू देखील बदलल्या आहेत. अगदी तेथील साठाही बदल झाला आहे. आता, येथील बाजारपेठांमध्ये, त्यांच्या वापरामध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या वस्तू, ज्यात अमेरिकन सैन्याच्या गणवेशाचा समावेश आहे, ते देखील विकल्या जात आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या नावावर असलेला हा बाजार अनेक वर्षांपासून बुश बाजार म्हणून प्रसिद्ध होता. परंतु आता हा बाजार पूर्णपणे बदलला आहे. ऐवढेच काय तर या बाजारात मिळणाऱ्या वस्तू देखील बदलल्या आहेत.

द सनच्या वृत्तानुसार, येथील काळ्या बाजारात नाईट व्हिजन गॉगल विकले जात आहेत, जे अमेरिकेने अफगाणिस्तानला भेट दिले होते. याशिवाय लेझर साईट्स आणि टॉर्चही विकल्या जात आहेत. स्थानिक सैनिकांमध्ये या गोष्टींना मोठी मागणी आहे.

अमेरिकेने अफगाणिस्तानला नाईट व्हिजन गॉगलच्या (Night Vision Goggles) 16 हजार जोड्या आणि 5 लाख बंदुका दिल्या होत्या. यातील बहुतेक गोष्टींवर तालिबान्यांनी ताबा केला आहे.

बाजारातही तालिबानींच्या प्रती असलेली स्थानिकांमधील भीती स्पष्ट दिसत आहे. येथील दुकानदार देखील प्रचंड घाबरले आहेत. दुकानदारांचे म्हणणे आहे की, पूर्वी मोठ्या संख्येने सैनिकही बाजारात येत असत, जे आता देश सोडून गेले आहेत. आता तालिबानी इथे येतात, ज्यामुळे प्रत्येक लोकांना भीती वाटत आहे. कारण इथे कधी काय घडेल आणि तालिबानी कधी काय करतील याचा काही नेम नाही.

तालिबानांना या दुकानातील जी वस्तू आवडत नाही ती, वस्तू तालिबानी तोडून टाकतात. यामध्ये संगीत वाद्यांचाही समावेश आहे, कारण त्यांना वाटते की, संगीत हे इस्लामच्या विरोधात आहे. ज्यामुळे त्यांनी या बाजारातील तबले आणि इतर साहित्य तोडून फेकून दिले आहे.

2001 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी अफगाणिस्तानात सैन्य पाठवले. त्याच्या नावावरून येथील बाजारपेठेचे नाव बुश बाजार ठेवले गेले होते, जे लष्करी शूजसाठी खूप प्रसिद्ध आहे. परंतु आता तालिबान्यांनीही या बाजाराचे नाव देखील बदलले आहे.