मृत्यूला इतक्या जवळून पाहिलं, पण वाचली, हैराण करणारा हा video होतोय व्हायरल

एक मोठी व्हेल (Giant Whale) एका महिलेच्या अगदी जवळ आली. ती महिला समुद्रात पॅडलबोर्डिंग करत होती. ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ कधीही पाहिला नसेल असाच आहे. विशाल व्हेलने पॅडलबोर्डरवर असलेल्या अर्जेंटीनाच्या गोल्फो नुएवो (Golfo Nuevo) धक्का मारला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण जर या व्हेल माशाला जर धोका वाटला असला तर यामध्ये महिलेचा जीव ही धोक्यात आला असता.

Updated: Sep 3, 2021, 05:45 PM IST
मृत्यूला इतक्या जवळून पाहिलं, पण वाचली, हैराण करणारा हा video होतोय व्हायरल title=

मुंबई : एक मोठी व्हेल (Giant Whale) एका महिलेच्या अगदी जवळ आली. ती महिला समुद्रात पॅडलबोर्डिंग करत होती. ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ कधीही पाहिला नसेल असाच आहे. विशाल व्हेलने पॅडलबोर्डरवर असलेल्या अर्जेंटीनाच्या गोल्फो नुएवो (Golfo Nuevo) धक्का मारला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण जर या व्हेल माशाला जर धोका वाटला असला तर यामध्ये महिलेचा जीव ही धोक्यात आला असता.

हा व्हिडिओ पाहताना जरी छान वाटत असलं तरी या घटनेनंतर ही महिला फारच घाबरली होती. मोठ्या व्हेलला पाहून ती देखील घाबरली. पण गोल्फोने कुठेही काहीही हालचाल न करता या परिस्थितीला तोंड दिलं. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ती खूश झाली. 54 सेकंदाच्या या व्हिडिओत व्हेल माशाला इतक्या जवळ येताना पाहणं आणि नंतर पुन्हा समुद्रात जाताना पाहणं हे नक्कीच वेगळा अनुभव देणारा क्षण आहे.

फोटोग्राफर मैक्सी जोनासने ही क्लिप शेअर करत ट्विट केलेय की, 2 मिलियनहून अधिक लोकांनी याला पाहिलं आहे. मॅक्सीने ट्विट केलं की, 'मला वाटतं की, आज मी माझ्य़ा आयुषातला सर्वात सुंदर व्हेल व्हिडिओ बनवला.'

काहींना हा दुर्मिळ क्षण वाटत आहे. काहींनी म्हटलंय की, याची कल्पना देखील केली नसेल. असे वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत.