माता न तू वैरणी! पोटच्या लेकरासह असं भयानक आणि हैवानी कृत्य केले की थरकाप उडेल

पोटच्या लेकरासह या महिलेने केलेले कृय पाहून पोलिस हादरले आहेत. तसेच हत्ये मागचे कारण ऐकूण पोलिस चक्रावले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: May 31, 2023, 11:22 PM IST
माता न तू वैरणी! पोटच्या लेकरासह असं भयानक आणि हैवानी कृत्य केले की थरकाप उडेल title=

Crime News : आईचा जीव हा मुलांमध्येच अडकलेला असतो. मात्र, एका आईने पोटच्या लेकरासह असं भयानक आणि हैवानी कृत्य केले आहे की ऐकूनच थरकाप उडेल. इजिप्तमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ही निर्दयी माता मनोरुग्ण नाही. तरी देखील तिने असं कृत्य का केले याचा खुलासा ऐकून पोलिस देखील चक्रावले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

डेली मेलने याबाबतचे वृत्त दिले आहे.  हाना मोहम्मद हसन (वय 29 वर्षे) असे या निर्दयी मातेचे नाव आहे. इजिप्तमध्ये राहणाऱ्या या महिलेने आपल्या पाच वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे. या महिलेने पोटच्या लेकाराचा जीव घेत त्याच्यासह अमानवीय कृत्य केले आहे. 

बादलीत सापडले मुलाचे तुकडे

या महिलेचे नातेवाईक तिच्या घरी आले असता हा प्रकार उघड झाला. घरात सर्वत्र रक्त सांडलेले होते. या महिलेचा मुलगा देखील घरात कुठेच दिसत नव्हता.  नातेवाईकांना घरात एका बदलीत मुलाच्या शरीराचे अवयव आढळून आले. नातेवाईकांनी हाना विचारले असता तिने उडवा उडवीची उत्तरे दिली. यानंतर त्यांनी पोलिसांनी बोलावले. 

शरीराचे तुकडे करुन डोकं भाजून खाल्ले

या महिलेने मुलाची हत्या केली. त्याच्या शरीराचे तुकडे केले आइ डोकं भाजून खाल्ल. पोलिस तापासात या महिलेने याची कबूली दिली आहे. पोलिसांनी या महिलेला तात्काळ अटक केली. तसेच या मुलाच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करुन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. 

महिलेने का केली मुलाची हत्या

हत्येची कबूली दिल्यानंतर पोलिसांनी या महिलेला हत्येचे कारण विचारले असता तिने उडवा उडवीची उत्तरे दिली. अखेरीस पोलिसांनी कसून विचारपूस केली असता महिलेने हत्येचे कारण सांगितले. या महिलेचे आणि पतीचे वाद होते. यांचे लग्न मोडले होते. मात्र, पती मुलाच्या संपर्कात होता. कायदेशीर लढाई लढून मुलावर हक्क मिळवण्याचा तो प्रयत्न करत होता. हे सर्व हानाला पटत नव्हते. पतीचा आणि मुलाचा संपर्क होवू नये. तो कायमचा मुलापासून दूर व्हावा यासाठी तिने तेठ मुलालाच संपवून टाकले.