Tips to Make Mehendi Dark : लग्न असो किंवा कोणतेही छोटे मोठे कार्यक्रम मेहंदी हा महिलांचा आवडता प्रकार आहे. मेहंदी लावण्यासाठी अनेक महिला कोणत्याही सणाची प्रतिक्षा करत नाहीत तर जेव्हा वाटेल तेव्हा मेहंदी काढून घेतात. पण कधी कधी मेहंदी ही हातावर चांगली काढली नसते. तर कधी कधी मेहंदी कितीही सुंदर असली तरी देखील त्याला सुंदर रंग येत नाही. त्यामुळे अनेकांचा मूड ऑफ होतो. त्यामुळे आता तुम्ही घरच्या घरी गुळापासून मेहंदी तयार करू शकतात. आता तुम्हाला हा प्रश्न असेल की हे खरंच शक्य आहे का? गुळापासून मेहंदी बनू शकते का? चला तर जाणून घ्या कशी बनवाल गुळापासून मेहंदी...
गुळापासून मेहंदी बनवायची असेल तर कोणत्या गोष्टी लागतात ते आधी जाणून घेऊया. मेहंदी बनवण्यासाठी शंबर ग्रॅम गुळ, दोन चमचे मेहंदी पावडर, पन्नास ग्रॅम साखर, एक चमचा कुंकू, तीस ग्रॅम लवंग, एक चिनी मातीचं वाडगं आणि एक टिन डब्बा. मेहंदी बनवण्यासाठी फक्त या गोष्टींचीच आवश्यकता आहे. आता गुळाची मेहंदी कशी बनवाल? मेहंदी बनवण्यासाठी सगळ्यात आधी गुळाचा चुरा करा. त्यानंतर टिनच्या डब्ब्यात तो गुळ घाला. त्यात मध्ये थोडी जागा करा आणि त्यात लवंग ठेवा. त्यानंतर या मेहंदीच्या डब्याला कोणी लगेच हात लावणार नाही याकडे लक्ष द्या. त्यानंतर चिनी मातीच्या वाडग्यात सगळी साखर घ्या आणि त्यात कुंकु घाला आणि त्या टिनच्या डब्याला गॅसवर ठेवा. त्यानंतर त्या डब्यावर पाणी भरलेलं एक भांड ठेवा आणि मग त्याला कव्हर करा. थोड्या वेळात पाहाल तर गुळ वितळू लागेल. त्यासोबत त्या भांड्यात वाफ देखील निर्माण झालेली असेल. थोड्यावेळा त्या गरम झालेल्या पाण्याला डब्याच्या वरून काढा आणि त्यात मेहंदी पावडर मिक्स करा. आता गुळ आणि मेहंदी असलेलं पाणी मिक्स करा तुमची मेहंदी तयार होईल.
गुळाची मेहंदी लावण्याची योग्य पद्धत
गुळाची मेहंदी लावण्यासाठी तुम्ही मेहंदी डिझाइन मोल्डची मदत घेऊ शकता. यासाठी तळहातावर साचा लावा आणि चमच्याने मेहंदी त्यात टाका आणि मग साचा काढून टाका. जर तुम्हाला कोणत्या कोणच्या मदतीनं मेहंदी लावायती असेल तर त्याला तुम्हाला थोडं घट्ट करावा लागेल आणि त्यासाठी तुम्ही त्यात मेहंदी पावडर मिक्स करू शकता.
गुळाची मेहंदीचे फायदे
गुळाची मेहंदी ही घरी बनवलेली असल्यानं त्यात केमिकल्सचा वापर केला जात नाही. तर बाजारात मिळणाऱ्या मेहंदीमध्ये केमिकल्स मोठ्या प्रमाणात असतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)