Aliens : एलियन्सना कुठे आणि कसं शोधायचं? 'ही' यूनिवर्सिटी देते खास ट्रेनिंग, फ्रीमध्ये घ्या अ‍ॅडमिशन

अंतराळात पृथ्वीशिवाय इतर कुठल्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का? खरचं एलियन (Aliens) अस्तित्वात आहेत का? हा नेहमीच कायमच कुतूहलाचा विषय असतो. याविषयीची माहिती या खास ट्रेनिंग कोर्समध्ये मिळणार आहे.  

Updated: Jan 26, 2023, 03:34 PM IST
Aliens : एलियन्सना कुठे आणि कसं शोधायचं? 'ही' यूनिवर्सिटी देते खास ट्रेनिंग, फ्रीमध्ये घ्या अ‍ॅडमिशन title=

Aliens News : आकाशाचं टोक आणि समुद्राचा तळ कुणीही गाठलेला नाही.  या विश्वात अशीच आणखी एक रहस्यमयी गोष्ट आहे ती म्हणजे एलियन्स (Aliens). अनेकजण एलियन्स अस्तित्वात असल्याचा दावा करतात. तर, अनेक जण एलियन्स हे काल्पनिक असल्याचे म्हणतात. तरी, देखील अनेक शास्त्रज्ञ UFO अर्थात फिरत्या तबडक्या आणि एलियन्स यावर संशोधन करत आहेत. अनेकांना या विषयांमध्ये इंटरेस्ट असतो. एलियन्सना कुठे आणि कसं शोधायचं? याच ट्रेनिंग ब्रिटनमधील एक यूनिवर्सिटी देते आहे. विशेष म्हणजे तुम्ही  फ्रीमध्ये अ‍ॅडमिशन घेवू शकता. 

ब्रिटन मधील एडिनबर्ग यूनिवर्सिटी  Astrobiology and the Search for Extraterrestrial Life या विषयाचे खास ट्रेनिंग देत आहे. या विशेष कोर्सअंतर्गत अनआइटेंडिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट (UFO) आणि एलियन्स याविषयी माहिती दिली जाते. 
हा विशेष ट्रेनिंग कोर्स पूर्णपणे ऑनलाइन आहे. Coursera द्वारे तुम्ही या कोर्ससाठी अ‍ॅडमिशन घेऊ शकता. Coursera ही अमेरिकेतील एक संस्था आहे, जी विद्यार्थांना अनेक कोर्सेस मोफत शिकण्याची संधी देते. 

Coursera च्या माध्यमातून शिकवले जाणारे सर्व अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन आहेत. एलियन्स आणि यूएफओशी संबंधित हा कोर्स करण्यासाठी खगोलशास्त्राचे  ज्ञान असणे आवश्यक नाही. मात्र, हा अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये असल्याने या भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. 

या विशेष ट्रेनिंग कोर्समध्ये काय शिकवले जाते? 

प्रोफेसर चार्ल्स कॉकेल, जे यूके सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोबायोलॉजीचे संचालक आहेत.  एडिनबर्ग विद्यापीठाद्वारे हा अभ्यासक्रम शिकवण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमात पृथ्वीतलावार सजीवाची उत्पत्ती कशी झाली. विश्वातील इतर ग्रहांवर जीवसृष्टी असण्याची शक्यता किती आहे? आपण एलियन कसे शोधू शकतो? याविषयी माहिती दिली जाते. एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी कशी शोधली जाऊ शकते आणि त्यासाठी कोणती साधने आवश्यक आहेत याविषयी देखील या कोर्समध्ये शिकवले जाते. 

Coursera वर उपलब्ध असलेला Astrobiology and the Search for Extraterrestrial Life अभ्यासक्रम हा शॉर्ट टर्म कोर्स आहे. विद्यार्थ्यांना व्हिडिओ, लेख, चर्चा आणि प्रश्नमंजुषा याद्वारे ट्रेनिंग दिले जाते. या कोर्सचा कालावधी फक्त पाच आठवड्यांचा आहे. दर, आठवड्याला दोन ते तीन तास अभ्यास ट्रेनिंग दिले जाते. पाच आठवड्यांच्या अभ्यासानंतर सर्टिफिकेट कोर्समध्ये अपग्रेड करण्याचा पर्याय देखील आहे. तुम्ही कोर्ससाठी थेट लिंकवर क्लिक करू शकता. Astrobiology and the Search for Extraterrestrial Life Course या Link वर जाऊन यासाठी अ‍ॅडमिशन घेऊ शकता.