Dog Killed Man: कुत्र्याने केला 30 वर्षीय तरुणाचा खून; कारमधील रायफल हत्येस जबाबदार

Dog Shoots Kills 30 year old US Man: पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास सुरु केला असला तरी प्राथमिक अंदाजानुसार हा मृत्यू अपघाती असल्याचा त्यांचा अंदाज असून ते इतर शक्यताही पडताळून पाहत आहेत.

Updated: Jan 26, 2023, 03:15 PM IST
Dog Killed Man: कुत्र्याने केला 30 वर्षीय तरुणाचा खून; कारमधील रायफल हत्येस जबाबदार title=
Dog Shoots Kills 30 year old US Man (File photo - Reuters. For representation only)

Dog Shoots Kills 30 year old US Man: शिकारीच्या उद्देशाने फेरफटका मारायला जाणं अमेरिकेमधील (USA) एका व्यक्तीच्या जिवावर बेतलं आहे. या व्यक्तीचा एका पाळीव कुत्र्यानेच (Pet Dog) खून केला आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण खरोखर हा प्रकार घडला आहे. विकेण्डनिमित्त या कुत्र्याबरोबर शिकारीच्या उद्देशाने (Hunting) फिरायला गेलेल्या व्यक्तीचा विचित्र पद्धतीने मृत्यू झाला आहे. शिकारीवरुन गाडीमधून परत येत असताना प्रवासादरम्यान कुत्र्याने बंदुकीच्या (rifel gun) ट्रीगरवर चुकून पाय ठेवल्याने सुटलेल्या गोळीमुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. फारच विचित्र अपघातामध्ये या व्यक्तीला प्राण गमवावे लागल्याच्या वृत्तावर पोलिसांनीही शिक्कामोर्तब केलं आहे.

नेमकं घडलं काय?

एका पीकअप ट्रकने हा कुत्रा आणि त्याचा मालक प्रवास करत असतानाच हा अपघात घडला. मरण पावलेली व्यक्ती या छोट्या आकाराच्या पीकअप ट्रकच्या पुढील सीटवर बसली होती. तर या व्यक्तीची गन मागील सीटवर होती जिथे कुत्रा खेळत होता. हे दोघेही शिकारीसाठी गेले होते तेव्हा हा प्रकार घडला असं अमेरिकेतील कान्स पोलिसांनी म्हटलं आहे. सुमनेर कंट्री शेरिफ ऑफिसमधून देण्यात आलेल्या माहितीनुसार, "या पीकअप ट्रकच्या मालकीच्या रायफच्या ट्रीगरवर कुत्र्याचा पाय पडला. त्यामुळे सुटलेली गोळी थेट गाडीच्या पुढील सीटवर बसलेल्या गाडीच्या मालकाला लागली. पाठीत गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला."

पोलिसांचं म्हणणं काय?

"या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. मात्र प्राथमिक अंदाजानुसार हा एक अपघात वाटत आहे," असं पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. पोलिसांनी हा कुत्रा मृत व्यक्तीच्या मालकीचाच होता का याबद्दलचा शोध सुरु केला असला तरी प्राथमिक अंदाजानुसार हा कुत्रा याच व्यक्तीच्या मालकीचा असल्याची दाट शक्यता आहे. 

अमेरिका यासाठी बदनाम

लोकांपेक्षा शस्त्र अधिक असलेला देश अशी अमेरिकेचे ओळख असल्याने अशाप्रकारच्या अपघातांमध्ये लोकांचा मृत्यू होण्याचं प्रमाण इथे फार जास्त आहे. अमेरिकेतील सरकारी आकडेवारीनुसार 2021 मध्ये बंदुकींसंदर्भातील अपघातांमध्ये 500 हून अधिक जणांनी प्राण गमावला आहे. अनेकदा अमेरिकेमध्ये ओपन फायरिंगच्या घटनाही घडल्या आहेत. सहजपणे मिळणारा शस्त्रपरवाना सध्या येथील सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. यासंदर्भातील कायदे आता कठोर करण्याची मागणीही केली जात आहे. अमेरिकेमधील गन कल्चर ही सध्या फार मोठी समस्या असून त्यावर अद्याप जगातील सर्वात प्रगत राष्ट्र म्हणवणाऱ्या महासत्तेला उपाय सापडलेला नाही.