अमेरिकेत एका ट्रान्सवुमनने एका 64 वर्षीय व्यक्तीच्या अंगावर गाडी घालत ठार केलं. यानंतर तिने गाडी रिव्हर्स घेत पुन्हा एकदा गाडी अंगावर घातली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी महिलेने त्याच्या मृतदेहाचे वारंवार किस घेतले आणि त्यानंतर चाकूने भोसकलं. तिने तब्बल 9 वेळा मृतदेाहावर चाकूने वार केले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
स्टिव्हन अँडरसन असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. घराबाहेर उभे असताना वेगवान वाहनाने त्यांना धडक दिल्याचं सीसीटीव्हीत दिसलं आहे. यानंतर गाडी रिव्हर्स घेत पुन्हा एकदा स्टिव्हन कार अंगावर घालण्यात आली. त्याचवेळी स्टिव्हन अँडरसन यांचा मृत्यू झाला. आरोपी महिलेने यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला.
कॅरन फिशर असं आरोपी महिलेचं नाव असून तिला अटक करण्यात आली आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, कॅरन घटनेनंतर पुन्हा एकदा तिथे आली होती. ती स्टिव्हनच्या मृतदेहावर झोपली आणि गळा दाबला. यानंतर तिने मृतदेहाचे किस घेतले. नंतर 9 वेळा चाकूने भोसकलं.
पोलिसांनी दिले माहितीनुसार, कॅरनने घटनेनंतर दुसऱ्या गाडीत बसण्याचा प्रयत्न केला. पण ती गाडीत बसू शकली नाही. यानंतर ती पायी धावू लागली होती. घटनास्थळी उभे लोक हा सगळा प्रकार पाहत होते. हॅरिस काऊंटीच्या रेकॉर्डनुसार, आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर हत्या, अटेपासून वाचण्यासाठी पळून जाण्याचा आणि रुग्णालय कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोर्ट रेकॉर्डमध्ये संशयिताला पुरुष सांगण्यात आलं होतं. पण पोलिसांनी तिची ओळख महिला सांगितली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, अटकेच्या आधी आरोपी फिशरने 2023 मध्ये अटकेपासून वाचण्याचा प्रयत्न केला होता. फिशरवर 2021 मध्ये देहविक्रीचा आरोप लावला होता.आरोपी महिलेला 24 मे रोजी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.