एका रात्रीत नशीब पालटलं! 8 करोड जिंकून झाला करोडपती

Viral Story : टेरी पीसने तिकीट काढल्यानंतर तपासणी केली असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण त्यांनी 160 रूपयात 8 करोडची लॉटरीच (Lottery Ticket) जिंकली होती. ही लॉटरी जिंकून त्यांचे नशीब पालटले आहे. 

Updated: Jan 15, 2023, 06:58 PM IST
एका रात्रीत नशीब पालटलं! 8 करोड जिंकून झाला करोडपती title=

Viral Story : कधी, कोणाच नशीब चमकेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत इसमाचे एका रात्रीत नशीब पालटले आहे.कारण तो व्यक्ती एका रात्रीत करोडपती (Crorepati) झाला आहे. त्याने 8 करोड रूपये जिंकले आहे. ही रक्कम जिंकून त्याचे आयुष्य बदलले आहे. नेमके या व्यक्तीचे एकाच रात्रीत आयुष्य कसे बदलले आहे. हे जाणून घेऊयात. 

लॉटरीचे तिकीट हरवले

टेरी पीस या 65 वर्षीय व्यक्तीने 160 रूपयांचे पॉवरबॉल लॉटरीचे (Lottery Ticket)तिकीट काढले होते. मात्र ते तिकीट त्याचे कुठेतरी हरवले होते. लाख शोधूनही टेरीला तिकीट मिळत नव्हते. शेवटी त्याने पत्नीला तिकीट शोधण्याची विनंती केली. पत्नीने पर्स तपासली असता तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिकीट तिच्याच पर्समध्ये ठेवले होते आणि ते दोघे घरभर शोधत होते. खरं तर पत्नीच्या पर्समध्ये तिकीट ठेवल्यानंतर टेरी विसरला होता. मात्र आता तिकीट सापडल्यानंतर जोडपं करोडपती झालंय.

160 रूपयांची लॉटरीत 8 करोड जिंकले

टेरी पीसने तिकीट काढल्यानंतर तपासणी केली असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण त्यांनी 160 रूपयात 8 करोडची लॉटरीच (Lottery Ticket) जिंकली होती. ही लॉटरी जिंकून त्यांचे नशीब पालटले आहे. 

हे माझ्यासाठी आयुष्य बदलणारे आहे. मी खुप भाग्यवान आहे. सुदैवाने पत्नीला तिकीट सापडले, असे टेरी म्हणालाय.तो पुढे म्हणतो, दशलक्ष डॉलर्स जिंकणारे किती लोक आहेत. माझा माझ्या नशिबावर विश्वास होता. आपण किती आनंदी आहोत हे शब्दात व्यक्त करू शकत नाहीत, असे तो म्हणतो. तसेच करोडपती होण्यात त्यांच्या पत्नीचा मोलाचा वाटा आहे. बायकोमुळे आयुष्य बदलले आहे. तो आता निवृत्तीची योजना आखत आहे, जेणेकरून त्याला पुढे आरामदायी जीवन जगता येईल. 

दरम्यान ही घटना अमेरिकेतील कॅरोलिना येथे घडली आहे. आता गेल्या आठवड्यात कर कपात केल्यानंतर टेरीला 5 कोटी 78 रुपये मिळाले. हे पैसे मिळाल्याने त्याचे आयुष्य बदलले आहे.