Viral News: 89 वर्षापूर्वीची लग्नपत्रिका आता का होतेय व्हायरल? असं आहे तरी काय यात?

Viral News: आपल्या जुन्या गोष्टी, त्यातील रहस्य आणि गमतीजमती वाचायला, पाहायला आणि जाणून घ्यायला फार आवडतात. त्यामुळे आपणही अशा ऐतिहासिक गोष्टींचा शोध लागल्यावर त्यातलं गंमत काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.

Updated: Jan 1, 2023, 10:37 PM IST
Viral News: 89 वर्षापूर्वीची लग्नपत्रिका आता का होतेय व्हायरल? असं आहे तरी काय यात? title=
file photo

Viral News: आपल्या जुन्या गोष्टी, त्यातील रहस्य आणि गमतीजमती वाचायला, पाहायला आणि जाणून घ्यायला फार आवडतात. त्यामुळे आपणही अशा ऐतिहासिक गोष्टींचा शोध लागल्यावर त्यातलं गंमत काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सध्या अशीच एक इंटरेस्टिंग गोष्ट (Wedding Card Viral) सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. लग्नपत्रिकाही अनेकदा व्हायरल होत असतात. त्यामुळे आपल्याला सेलिब्रेटींच्या लग्नपत्रिका किंवा कुठल्यातरी महत्त्वाच्या व्यक्तीच्या लग्नपत्रिका व्हायरल होऊ लागल्या की आपणही फार उत्सुकतेनं (Old Wedding Card) त्या पाहतो. सध्या अशीच एक लग्नपत्रिका व्हायरल होते आहे आणि ही लग्नपत्रिका चक्क 89 वर्ष जुनी आहे. 

सोनल बाटलाने या युझरन ट्विटवर हा फोटो पोस्ट केला आहे. 1933 मध्ये माझ्या आजी-आजोबांच्या लग्नाचे आमंत्रण पत्रिका, असं त्या युझरनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.  कॉफी ब्राऊन शेड कार्डमध्ये तुम्ही उर्दूतील ही कॅलिग्राफी स्पष्टपणे पाहू शकता. यामध्ये एक व्यक्ती 23 एप्रिल 1933 रोजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या आमंत्रणासाठी पत्र लिहिताना दिसली आहे. हो ही लग्नपत्रिका आठ दशकं जूनी आहे तेव्हा तेव्हाची भाषा आणि लिहिणं किती वेगळं आहे पहा. त्यात 2 एप्रिल 1933 ला होणाऱ्या लग्नाच्या तपशीलाची माहिती दिली आहे.

काय लिहिलंय या पत्रिकेत? 

वधूचे घर किशनगंजमध्ये असल्याचे यात लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'मी तुम्हाला माझ्या घरी येण्याचे आमंत्रण देतो आहे, तेथून आम्ही लग्नासाठी किशनगंजमधील वधूच्या घरी जाऊ. यानंतर मेजवानी होईल. वलीमा 24 एप्रिल 1933 चा आहे. तुम्ही सकाळी 10 वाजता माझ्या घरी या.  

लग्नपत्रिकांची खासियत...

आपल्या आई वडिलांच्या, काका काकूच्या आणि आज्जी आजोबांच्या लग्नपत्रिका या व्हायरल होत असतात. त्यामध्ये काय लिहिलंय हे जाणून घेण्याचीही आपल्याला खूप इच्छा लागून राहिली असते. आत्ताच्या लग्नपत्रिकांमध्ये आणि जून्या लग्नपत्रिकांमध्ये नेहमीच तुलना होत असते. परंतु आपल्याला आपल्या पुर्वजांच्याच लग्नपत्रिका पाहायला अधिक गंमत वाटते. या लग्नपत्रिकेला अनेकांनी लाईक्स आणि शेअर केले आहे. या लग्नपत्रिकेवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. ही पत्रिकाही खूप जणांनी शेअर केली आहे. सध्या या लग्नपत्रिकेची सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे तुम्हीही हा खजिना मिस करू नका. हा फोटो तब्बल 89 वर्ष जुना आहे. या डिजिटल लग्नपत्रिकेंच्या काळात अशी जूनी लग्नपत्रिका पाहण्याची चांगलीच पर्वणी नेटकऱ्यांनी मिळाली आहे.