Kabul Attack: नववर्षात तालिबान्यांवर धुमधडाके; काबुलच्या सैन्य तळावर मोठा हल्ला, अनेकांचा मृत्यू!

Kabul bomb blast: अफगाणिस्तानातील काबूलमध्ये आज सकाळी लष्करी विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट (Kabul military airport) झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेलाय.

Updated: Jan 1, 2023, 09:30 PM IST
Kabul Attack: नववर्षात तालिबान्यांवर धुमधडाके; काबुलच्या सैन्य तळावर मोठा हल्ला, अनेकांचा मृत्यू! title=
Attack on Kabul military airport

Kabul bomb blast : गेल्या वर्षी तालिबानच्या (Taliban) सैन्याने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील (Kabul) राष्ट्रपतींच्या राजवाड्यावर कब्जा केला. त्यानंतर तालिबान्यांनी पुर्ण अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवला आणि सत्ता ताब्यात घेतली. अशातच आता अफगाणिस्तानच्या जाचक अटींचा सामना सर्वसामान्य लोकांना करावा लागतोय. अशातच आता काबूलमधून धक्कादायक माहिती (Kabul Attack) समोर आली आहे. तालिबानी राजवटीत नववर्षाची सुरूवात धुमधडाक्याने झाल्याचं पहायला मिळतंय. (Attack on Kabul military airport 10 dead 8 injured in bomb blast marathi news)

अफगाणिस्तानातील काबूलमध्ये आज सकाळी लष्करी विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट (Kabul military airport) झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेलाय. स्फोटाच्या घटनेमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हा हल्ला (Kabul bomb blast) अफगाणिस्तान सैन्य दलाच्या हवाई तळावर झाल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा - Video : हातात बॉम्ब घेऊन पाकिस्तानी लोक घर का गाठतायत? कारण वाचून बसेल धक्का...

रविवारी झालेल्या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 8 लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, मृत्यूबाबत अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आली नाही. हल्ला हा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (International Airport) झाल्याचं मंत्रालय प्रवक्ते अब्दुल नाफी टाकोर (Abdul Nafi Takor) यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, बॉम्बस्फोटात काही नागरिक मारले गेल्याचं देखील अब्दुल नाफी टाकोर यांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वी काबूलच्या एका हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) झाला होता. त्यावेळी चीनचे काही वरिष्ठ अधिकारी त्याठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी चकमक झाल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे आता गुप्तहेर खातं (intelligence bureau) आता अलर्ट मोडवर असल्याचं पहायला मिळंतय.