FriendZone करणाऱ्या मैत्रिणीविरोधात 24 कोटींचा खटला, तरुणाची कोर्टात धाव

Friend Zone : कधी कधी नकार मिळण्यापेक्षा फ्रेंडझोन होणे अधीक दुखावणारं असतं. कळतंय पण वळत नाही प्रमाणे माहिती असतानाही काहीजण फ्रेंडझोन होण्यापर्यंत प्रयत्न करत असतात. पण या पठ्ठ्याने उचलेल्या पावलामुळे सर्वांनाच धक्का बसलाय

Updated: Feb 2, 2023, 03:47 PM IST
FriendZone करणाऱ्या मैत्रिणीविरोधात 24 कोटींचा खटला, तरुणाची कोर्टात धाव title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Friend Zone : प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी फ्रेंड झोनचा (Friend Zone) सामना करावाच लागतो. कधी एकतर्फी प्रेमातून (one side love) तर कधी मिळालेल्या नकारानंतर फ्रेंडझोन केले जाते. कधी कधी नकार मिळण्यापेक्षा फ्रेंडझोन होणे अधीक दुखावणारं असतं. कळतंय पण वळत नाही प्रमाणे माहिती असतानाही काहीजण फ्रेंड झोन होण्यापर्यंत प्रयत्न करत असतात. पण एका प्रियकराने त्याला फ्रेंडझोन (Friend Zone Trauma) केल्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. या कथित प्रियकराने त्याच्या मैत्रिणीवर 3 मिलियन डॉलरचा (24.50 कोटी) दावा ठोकला आहे.

आपण फक्त मित्र बनून राहूया

सिंगापूरमध्ये हा सर्व प्रकार घडलाय आहे. तरुणीने कथित प्रियकराच्या प्रेमाला नकार देत आपण फक्त मित्र बनून राहूया, असे सांगितले. त्यानंतर चिडलेल्या प्रियकराने जीवापाड प्रेम करणाऱ्या मैत्रिणीला कोर्टात खेचलं आहे. यासोबत तिच्यावर 3 मिलियन डॉलर म्हणजे 24.50 कोटींचा दावा ठोकला आहे. के. कॉशिगन असे या प्रियकराचे नाव असून मुलीचे नाव नोरा टॅन असे आहे. नोराने कॉशिगनचा प्रेमाचा प्रस्ताव नाकारुन आपण फक्त चांगले मित्र आहोत असल्याचे त्याला सांगितले होते.  मात्र कॉशिगनला हे पटणारे नव्हते. त्याला फसवणूक झाल्याचे वाटल्याने तो थेट कोर्टाची पायरी चढला. 

तिला प्रेयसी मानू लागला अन्...

कोशिगनचे म्हणणे आहे नोराने त्याचे प्रेम नाकारले आणि त्याला फ्रेंड झोन केले. मुलगी त्याला फक्त मित्र मानते हे कळल्यावर त्याच्या भावना दुखावल्या. याचा बदला घेण्यासाठी त्याने मुलीवर गुन्हा दाखल केला. 2016 मध्ये दोघांची पहिली भेट झाली आणि त्यांची मैत्री झाली. हळूहळू, कोशिगनच्या मनात नोराबद्दल भावना निर्माण झाल्या. पण नोरा फक्त आपल्यात मैत्री असल्याचे सांगत राहिली. सप्टेंबर 2020 मध्ये दोघांमध्ये वाद सुरू झाला तेव्हा नोराने कोसिगनला स्पष्ट शब्दात आपण फक्त चांगले मित्र आहोत असे सांगितले. मात्र कोसिगन तिला आपली प्रेयसी मानू लागला.

यानंतर दुखावला गेल्याने कोशिगनने भावनिक होत नोरावर खटला भरायचा निर्णय घेतला होता. पण नोरा टॅनने त्याच्यासोबत समुपदेशन सत्रात सहभागी होण्याचे मान्य केल्यावर कायदेशीर कारवाई न करण्याचा कोशिगनने निर्णय घेतला. मात्र समुपदेशनदरम्यान, नोराने कोशिगनला सांगितले की इथे येणे मला योग्य वाटत नाही. यानंतर कोशिगनने नोराला धमकी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघेही दीड वर्षांहून अधिक काळ समुपदेशन घेत राहिले. या सर्व काळात नोरा आपल्याला नाकारत आहेत हे कोशिगनला मान्य नव्हते.

समुपदेशन संपल्यानंतर कोशिगनने नोराविरुद्ध दोन खटले दाखल केले. हायकोर्टात जवळपास 25 कोटी रुपयांचा दावा ठोकत कोशिगनने टॅनवर कोशिगनच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवल्याचा, नैराश्यात घालवण्याचा आरोप केला. तर दुसऱ्या खटल्यात कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे 18 लाख रुपयांचा दावा ठोकला आहे. 9 फ्रेबुवारी रोजी या प्रकरणी सुनावणी होणार असून कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.