बीजिंग : मुलांमध्ये वाढणारी क्रूरता दर्शवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
चीनमधील सिचुआन भागात एका १३ वर्षाच्या मुलाने आपल्या आईचा गळा कापून हत्या केली आहे. तो मुलगा इतक्यावरच थांबला नाही तर त्याने या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि चायनीज सोशल मीडियावर शेअर देखील केला. सोशल मीडिया अॅप वी-चॅटच्या माध्यमातून आपल्या मित्रांना पाठवला. त्यातील एका मित्राने हा व्हिडिओ आपल्या आईला दाखवला तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. त्यानंतर ही माहिती पोलीसांना मिळाली आणि पोलीसांनी त्या बाल गुन्हेगाराला अटक केली.
ही घटना रविवारी रात्री घडली. या मुलाचे आपल्या आईसोबत वाद झाला होता. त्या रागातून मुलाने हे भयंकर पाऊल उचलले. त्याने आईचा गळा चिरून आईचे मुंडके एका बादलीत लपवून ठेवले होते. हे प्रकरण समोर येताच पोलीसांनी त्या मुलाला शाळेतून अटक केले.