नवी दिल्ली : स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत हगणदारीमुक्त गाव करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी प्रत्येक गावागावात शौचालय बांधण्यात येत आहेत.
अनेक ठिकाणी नागरिक इंग्लिश टॉयलेट बांधत आहेत. या टॉयलेट सीटवर आरामात शौचास बसता येतं. तुम्हीही टॉयलेट सीटचा वापर करता तर मग हा व्हिडिओ नक्की पाहा.
टॉयलेट सीटवर बसण्यापूर्वी फ्लश जरुर करा. कारण नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये टॉयलेट सीट दिसत आहे आणि सर्व सुरळीत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, त्यानंतरचा नजारा पाहून सर्वांनाच धक्का बसला.
ऑस्ट्रेलियातील एका घरात विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका व्यक्तीला आपल्या टॉयलेट पॉटच्या आतमध्ये चक्क साप आढळून आला आहे.
त्यानंतर हा साप सर्पमित्रांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला.
या व्हिडिओत पहायला मिळत आहे की, एक व्यक्ती चिमट्याच्या सहाय्याने सापाला टॉयलेटमधून बाहेर काढत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.