पिरीयड्सचा फ्लो अचानक का कमी होतो? जाणून घ्या

अनेकदा महिलांना त्यांच्या ब्लिडींगच्या फ्लोमध्ये फरक जाणवतो. मात्र हा फरक नेमका का जाणवतो हे जाणून घेऊया

Updated: Feb 19, 2022, 03:56 PM IST
पिरीयड्सचा फ्लो अचानक का कमी होतो? जाणून घ्या title=

मुंबई : महिलांचे पिरीयड्स त्यांना त्यांच्या आरोग्याबाबत बरीच माहिती देतात. अनियमित पिरीयड्स प्रेग्नेंसीच्या आरोग्यावर परिणाम करते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. प्रत्येक महिलेच्या पिरीयड्सचा काळ वेगळा असतो. काही महिलांची मासिक पाळी 2 ते 7 दिवसांपर्यंत सुरु राहू शकते. तर अनेकदा महिलांना त्यांच्या ब्लिडींगच्या फ्लोमध्ये फरक जाणवतो. मात्र हा फरक नेमका का जाणवतो हे जाणून घेऊया

हेवी आणि दीर्घकाळा चालणारी मासिक पाळी काही आजार किंवा रक्तासंबंधीच्या विकारांचे संकते देतात. जर मासिक पाळीदरम्यान असामान्यपणे तुम्हाला रक्तस्राव कमी होत असेल तर यामुळे गर्भधारणेत समस्या, रोजनिवृत्ती, किंवा पीसीओएससारख्या समस्या उद्भवू शकतात.

पिरीयड्सदरम्यान कमी फ्लोची कारणं

पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम

पिरीयड्समध्ये रक्तस्राव कमी असल्यास हे पीसीओएस, हार्मोन्सचं असंतुलन, ओव्हुलेशनमध्ये अडचण या समस्याचं लक्षण असू शकतं. 

प्रेग्नेंसीमुळे रक्तस्राव कमी होऊ शकतं

गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात तुमच्या मासिक पाळीचा फ्लो कमी असण्याची शक्यता आहे. गर्भधारणेच्या जवळपास 10-14 दिवसांनंतर इम्प्लांटेशन ब्लीडिंग किंवा लाईट स्पॉटिंग असं दिसून येऊ शकतं.

थायरॉईड

तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल तर त्याचा परिणाम तुमच्या मासिक पाळीवर होऊ शकतो. हार्मोन्समध्ये बदल झाल्यानंतर थायरॉईडची समस्या उद्भवते. त्यामुळे मासिक पाळीच्या फ्लोवरही याचा परिणाम होतो.