चुकीच्या साईजची ब्रा वापरणं पडेल महागात; आजच सावध व्हा

तुम्हीही असं करत असाल तर सावधान व्हा. कारण याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतोय...

Updated: Feb 19, 2022, 11:10 AM IST
चुकीच्या साईजची ब्रा वापरणं पडेल महागात; आजच सावध व्हा title=

मुंबई : महिला नेहमी त्यांच्या फॅशनबद्दल अपडेट असतात. मग भले तो मेकअप असो किंवा कपडे...फॅशनबाबत सगळ्या गोष्टी महिला अगदी विचारपूर्वक करतात. मात्र एक गोष्ट अशी आहे ज्यामध्ये महिला अधिक विचार करत नाही असं म्हटलं जातं. महिला अनेकवेळा ब्रा घेताना फार घाईघाईत घेतात. तुम्हीही असं करत असाल तर सावधान व्हा. कारण याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतोय...

एका अभ्यासानुसार, असं लक्षात आलंय की, 80 टक्के महिला चुकीच्या साईजच्या ब्राचा वापर करतात. यामध्ये 70 टक्के महिला साईजपेक्षा छोट्या ब्राचा वापर करतात. तर 10 टक्के महिला या मोठ्या आकाराच्या ब्रा वापरत असल्याचं समोर आलंय. 

चुकीच्या साईजच्य ब्रा वापरल्याने महिलांना नंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये पाठदुखी, खांदेदुखी, रॅशेज तसंच आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात. यापासून मुक्ती हवी असल्यास महिलांनी योग्य साईजची ब्रा वापरली पाहिजे. 

चुकीच्या साईजची ब्रा वापरल्याने होणारे त्रास

खांदेदुखी 

चुकीच्या आकाराच्या ब्रा घातल्यामुळे महिलांना खांदेदुखी तसंच मान दुखू शकते. काही महिलांसाठी वजनाला आधार देणाऱ्या रुंद पट्ट्या असलेल्या ब्रा डिझाइन केल्या असतात. त्यामुळेच जर तुम्ही साईजपेक्षा लहान ब्रा घातली तर खांदेदुखीसारख्या समस्या वाढू लागतात.

ब्रेस्ट पेन

जर तुम्ही चुकीच्या साईजच्या ब्राचा वापर करत असाल तर सर्वात मोठी समस्या उद्भवते ती म्हणते ब्रेस्ट पेन. ज्या व्यक्ती योगा किंवा व्यायाम करतात त्या व्यक्तींना हा त्रास जास्त होतो. 

पाठदुखी

रिसर्चमध्ये असं समोर आलंय की, चुकीच्या साईजची ब्रा घातल्याने पाठदुखीची समस्या बळावण्याची शक्यता असते.