सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण?

भाऊ रंगारी मंडळाने दावा केल्यामुळे हे वाद पेटला होता.

Updated: Aug 25, 2018, 10:44 PM IST
 सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण?  title=

पुणे: गणेशोत्सवाआधी पुण्यात परंपरेप्रमाणे जुना वाद उफाळून आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे जनक कोण? यावरुन दोन गट पडले आहेत. दरवर्षी यावरुन वाद-प्रतिवाद होतात. मात्र, यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. 
 
 यंदा पुणे महापालिकेचा बेजबाबदारपणा हा वाद उकरुन काढण्यासाठी कारणीभूत ठरला. गेल्यावर्षी भाऊ रंगारी मंडळाने दावा केल्यामुळे हे वाद पेटला होता. मात्र, कालांतराने हा वाद शांत झाला. यावर्षी मनपाने संकेतस्थळावर भाऊ रंगारी हेच गणेशोत्सवाचे जनक असल्याचा उल्लेख केला.

त्याबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मनपाचं अभिनंदनही केले. या प्रकारामुळे मनपात गोंधळ उडाला. हा वादग्रस्त मजकूर रात्री संकेतस्थळावरुन काढण्यात आला. आता हा मजकूर प्रसिद्ध करणे आणि तो काढून टाकणं मनपासाठी तापदायक झाले आहे. याप्रकरणी मनपाला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय भाऊ रंगारी मंडळाने घेतला आहे.