अकोला : राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका पार पडल्या. नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार, पालघर या सहा जिल्हा परिषदांसाठी मतदान पार पडले होते. यापैकी अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीने मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील 14 पैकी 6 जागा आघाडीने मिळवल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठी सुमारे 63 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.
अकोला जिल्हा परिषद : (विजयी/आघाडी)
निवडणूक झालेल्या एकूण जागा : 14
1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना
2) घुसर : शंकरराव इंगळे वंचित
3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष
4) अंदूरा : मीना बावणे : वंचित
5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी
6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष
7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित
8) बपोरी : माया कावरे : भाजप
9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित
10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित
11) दगडपारवा : किरण अवताडे मोहोड : राष्ट्रवादी
12) दानापूर : गजानन काकड : काँग्रेस
13) कुटासा : स्फूर्ती गावंडे : प्रहार
14) तळेगाव: संगीता अढाऊ: वंचित
एकूण जागा : 14
निकाल जाहीर : 14
वंचित : 06
अपक्ष : 02
शिवसेना : 01
राष्ट्रवादी : 02
भाजप : 01
काँग्रेस : 01
प्रहार : 01