पावसात कसे मिळवाल मुंबई लोकलचे लाइव्ह लोकेशन?; मध्यरेल्वेचे 'हे' अ‍ॅप आत्ताच डाऊनलोड करा

Mumbai Local Train Yatri App: भरपावसातही मुंबई लोकलचे लाइव्ह लोकेशन आता प्रवाशांना मिळणार आहे. पण काय आहे हे अॅप? कसा वापर करणार? वाचा सविस्तर बातमी 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 27, 2023, 07:01 PM IST
पावसात कसे मिळवाल मुंबई लोकलचे लाइव्ह लोकेशन?; मध्यरेल्वेचे 'हे' अ‍ॅप आत्ताच डाऊनलोड करा title=
Yatri app now you can easily track Mumbai local trains in real time easily in monsoon

Mumbai Local Train Yatri App: मुसळधार पाऊस बरसत असताना मुंबई व लगतच्या परिसरात राहत असलेल्या नोकरदारांना एकच काळजी लागून राहिलेली असते ती म्हणजे लोकलची. मुसळधार पावसाचा फटका लोकलला पडतो. पावसात ट्रेन कुठे थांबलीय, स्थानकात यायला किती वेळ लागेल? या प्रश्नांनी हैराण झालेले असतात. अशातच प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक नवीन सुविधा सुरु केली आहे. त्यामुळं भरपावसातही प्रवाशांना लोकलचे लाइव्ह लोकेशन कळणार आहे.

12 जुलै 2022 मध्ये मध्य रेल्वेने यात्री अॅप प्रवाशांसाठी लाँच केले होते. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना या अॅपच्या माध्यमातून लोकल ट्रेनचे रिअल टाइम लाईव्ह लोकेशन कळणार आहे. एका क्लिकवर प्रवाशांना ट्रेनचे लाइव्ह अपडेट्स, घोषणा, ताजे घोषणापत्रक, प्रमुख रेल्वेस्थानकांचे नकाशे देखील मिळणार आहे. 

पश्चिम आणि मध्य रेल्वेने आपल्या ताफ्यातील सर्व रेल्वेगाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या मुळेच लोकल कोणत्या स्थानकात आहे आणि आता कोणत्या वेळेत तुम्हाला हव्या असलेल्या स्थानकात येईल, हे प्रवाशांना मोबाइलवर समजू शकणार आहे. 

मध्य रेल्वेवर या अॅपला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. हे अॅप अँड्रोइड आणि आयओएस अशा दोन्हीसाठी उपलब्ध असणार आहे. सध्यास्थितीत पश्चिम रेल्वेच्या 93 उपनगरीय रॅकवर जीपीएस डिव्हाइस इन्स्टॉल करण्यात आली आहेत. तसंच, एसी लोकलसाठीही हे जीपीएस यंत्रणा इन्स्टॉल करण्यात आली आले आहे. त्यामुळं ट्रेनचे रियल टाईम लोकेशन सांगण्यास सक्षम असणार आहे. 

ट्रेनचे लोकेशन कसं तपासणार?

१.  तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते स्टेशन सिलेक्ट करा
२. ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या प्रवासाची दिशा निवडा
३ ट्रेनचे लाइव्ह लोकेशन मिळवण्यासाठी ट्रेनच्या टाइमटेबलवर क्लिक करा

अॅपचा अलर्ट कसा सेट कराल?

तुम्ही आता ज्या स्थानकांवर आहात तिथून ट्रेन निवडू शकता 

5 ते 3 मिनिटे किंवा किंवा तुम्ही निवडलेल्या दिवसाआधी अलर्ट सेट करता येतो

दर १५ सेकंदानंतर अॅप ऑटो रिफ्रेश होईल. युजर्स लेटेस्ट डेटासाठी रिफ्रेशवर क्लिक करु शकतात. 

दिव्यांगासाठीही आहे यात्री अ‍ॅप 

दिव्यांग प्रवासीदेखील हे अॅप सहज हाताळू शकतात. अनेकजण व्हॉईस कमांडद्वारे मोबाईल हाताळतात. ते गुगल असिस्टंटद्वारे त्यांच्या ट्रेनचे थेट लोकेशन सहज शोधू शकतात.