आता कार्ड, UPIची कटकट सोडा, हात दाखवूनही होईल पेमेंट, कसं ते पाहा!

Amazon One Payment: आता कार्ड आणि यूपीआयशिवायही तुम्ही पेमेंट करु शकणार आहात. फक्त हात दाखवा आणि क्षणात पेमेंट होणार आहे. कसं ते पाहा. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 27, 2023, 02:33 PM IST
आता कार्ड, UPIची कटकट सोडा, हात दाखवूनही होईल पेमेंट, कसं ते पाहा! title=
Amazon to add pay by palm tech pay for items by swiping their hand

Amazon One Payment: जसा जसा काळ बदलत चालला आहे. तशी टेक्नोलॉजीदेखील बदलत चालली आहे. सुरुवातीला एखादी वस्तू खरदे करताना रोख रक्कम द्यावी लागायची. अशावेळी पैसे कमी पडले की मन मारुन सामान बाहेर काढून ठेवावे लागायचे. पण कार्ड आणि यूपीआय पेमेंटची सेवा सुरु झाल्यानंतर मनसोक्त खरेदी करता येते. मात्र आता लवकरच एक नवी टेक्निक लाँच होत आहे. आता फक्त हात दाखवताच तुमचं पेमेंट होणार आहे. तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना, इथे वाचा सविस्तर या नवीन तंत्रज्ञानाविषयी. 

कार्ड आणि यूपीआयमुळं आता पेमेंट करणे सोप्पे झाले आहे. डिजीटलच्या युगात फोनरुनही पैसे पाठवणे व देणे सोप्पे झाले आहे. गुगल पे, फोन पे, पेटीएम यासारखे अॅप्सवर यूपीआय पेमेंट करता येऊ शकते. मात्र, आता आणखी एक नवीन अपटेड समोर येत आहे. अॅमेझॉनने यापुढे जात एक नवीन टेक्नोलॉजी आणली आहे. कंपनीने Amazon One ची घोषणा केली आहे. 

Amazon Oneच्या माध्यमातून हात दाखवून पेमेंट करु शकता. सध्या Whole Foods स्टोरवर याची सुरुवात करण्यात आली आहे. Amazon Prime मेंबर्ससाठी याआधीपासूनच हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मात्र लवकरच कंपनी इतर स्टोअर्सवरही सुरू करण्याच्या विचारात आहेत. जर तुम्ही प्राइम मेंबर असाल तर Amazon Oneचा वापर केल्यास तुम्हाला डिस्काउंटदेखील मिळणार आहे. 

कसं सुरू कराल?

ही सेवा सुरु करण्याआधी सर्वात आधी Amazon One Kioskवर रजिस्टर करावे लागणार आहे. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला डेबिट कार्डचा टर्मिनल म्हणून ठेवावे लागेल आणि त्यानंतर रिडरवर हात ठेवून तुमचा हात वेव्ह करावा लागणार आहे. या प्रक्रियेच्या शेवटी तुमचा फोन नंबर टाकून रजिस्टरची प्रक्रिया पूर्ण होईल. 

हात स्कॅनकरुन पेमेंट कसे करता येईल असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. तसंच, ते सुरक्षितत आहे का? तर याचीही उत्तरे आम्ही तुम्हाला देणार आहोत. फिंगरप्रिंट लॉकप्रमाणेच हाताचे स्कॅनरदेखील प्रत्येकाचे वेगवेगळे असते. म्हणजेच प्रत्येक युजर्सचे हाताचा प्रिंट फिंगरप्रिंटप्रमाणे वेगवेगळे असते. त्यामुळं तुमच्या हाताचा कोणी क्लोनही करु शकणार नाही, त्यामुळं हा पेमेंट मोड सुरक्षित मानला जातो. 

प्रायव्हसी आणि सिक्युरिटीच्या मुद्द्यावही अॅमेझॉनने स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही युजर्सचा डेटा थर्ड पार्टीसोबत शेअर कंपनीकडून शेअर केला जात नाही. हा डेटा फक्त सरकारी यंत्रणांनी आदेश दिल्यास फक्त त्यांच्यासोबतच शेअर केला जातो. त्याचबरोबर युजर्सचा बायोमेट्रिक डेटा AWS Cloudमध्ये स्टोअर होतो. हे क्लाउट स्टोरेज अत्यंत सुरक्षित असल्याचे मानले जाते.