व्हॉट्सअ‍ॅपचं 'हे' नवं अपडेट केवळ अ‍ॅन्ड्राईड स्मार्टफोनधारकांंसाठी !

आजकाल आबालवृद्धांना 'व्हॉट्सअ‍ॅप'च  व्यसन लागलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपशिवाय अनेकांचं पानही हलत नाही. त्यामुळे ग्राहकांना सतत नवनवे अपडेट्स देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सज्ज असते. 

Updated: Apr 2, 2018, 12:56 PM IST
व्हॉट्सअ‍ॅपचं 'हे' नवं अपडेट केवळ अ‍ॅन्ड्राईड स्मार्टफोनधारकांंसाठी !  title=

मुंबई : आजकाल आबालवृद्धांना 'व्हॉट्सअ‍ॅप'च  व्यसन लागलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपशिवाय अनेकांचं पानही हलत नाही. त्यामुळे ग्राहकांना सतत नवनवे अपडेट्स देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सज्ज असते. 

नुकतेच व्हॉट्सअ‍ॅपने एक नवे अपडेट जाहीर केले आहे. त्यानुसार, नव्या व्हर्जनमध्ये 'चेंज नंबर' हे नवं फीचर देण्यात आलं आहे. या फीचरमुळे तुमचा डाटा नव्या क्रमांकावर ट्रान्सफर करणं सुकर होणार आहे. सध्या 2.18.97

अ‍ॅन्ड्रॉईड बीटा व्हर्जनमध्ये गूगल प्ले स्टोअरमध्ये ही सोय उपलब्ध आहे. 

ड्युप्लिकेट चॅटची समस्या संपली  

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरमुळे तुमचा नंबर बदलला तरीही चॅट ड्युप्लिकेट होणार नाही. चॅट हिस्ट्री फोनमध्ये नव्या चॅटमध्ये दिसणार आहे. फोनमध्ये सेव्ह असलेले नंबरही खास चिन्हांनी दाखवले जाणार आहे.  

सध्या ही सुविधा केवळ अ‍ॅन्ड्राईड स्मार्टफोन धारकांंसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. लवकरच ही सुविधा आयओएस आणि विंंडोज स्मार्टफोनधारकांंसाठीही खुली करण्यात येणार आहे.