Volvo XC40 Recharge launch Date: व्होल्वो भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. Volvo आपली इलेक्ट्रीक एसयूव्ही XC40 उद्या म्हणजेच 26 जुलैला लाँच करणार आहे. या गाडीत गुगल बिल्ट इन दिलं आहे. त्यामुळे प्रवासासह रस्ता शोधणं सुखकर होईल. गुगल मॅपमुळे एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी रियल टाइम वाहतुकीची माहिती मिळते. या व्यतिरिक्त गुगल असिस्टेंटद्वारे सूचना देखील मिळतात. त्यामुळे मनोरंजनासह मित्र, कुटुंबीयांसोबत संपर्कात राहणं सोपं आहे. ही सिस्टम सुरु करण्यासाठी फक्त 'OK Google' बोलावं लागेल.
XC40 रिचार्जला ऑटोमॅटिक ओव्हर-द-एअर अपडेट्स मिळतात. यामुळे कार वेळेनुसार अपडेट होत राहते. हे प्रवाशांना बाहेरील परिस्थिती काहीही असो, चांगल्या आणि निरोगी हवेच्या गुणवत्तेचा आनंद घेण्यास मदत करू शकते. पार्टिक्युलेट आणि परागकणांच्या पातळीचेही कारच्या बाहेर निरीक्षण केले जाऊ शकते.
Charge into the future with the Pure Electric XC40 Recharge. Launching on 26th July. Stay Tuned.#XC40Recharge #FutureIsElectric pic.twitter.com/emKUGnmJos
— Volvo Car India (@volvocarsin) July 24, 2022
व्होल्वो कार इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक ज्योती मल्होत्रा यांनी सांगितले होते की, "आम्ही भारतीय बाजारपेठ वाढवण्यासाठी कटिबद्ध आहोत. बेंगळुरू येथील आमच्या प्लांटमध्ये आमची नवीनतम ऑफर XC40 रिचार्ज असेंबल करण्याची योजना आमचा संकल्प प्रतिबिंबित करते. आम्ही आधीच सांगितले आहे की आम्ही 2030 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक कार कंपनी बनू." यापूर्वी व्होल्वो कार इंडियाने गेल्या वर्षी XC60, S90 आणि XC90 मॉडेल्स पेट्रोलवर चालणाऱ्या 48V सौम्य-हायब्रीड प्रणालीसह लाँच केल्या होत्या आणि सर्व डिझेल मॉडेल टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले होते.