मुंबई : वीवोने भारतीय बाजारपेठेत वीवो Y95 लॉन्च केलाय. वीवोच्या वाय सिरिजमधील हा मिड रेंज स्मार्टफोन असून स्टेरी ब्लॅक आणि नेबुला पर्पल रंगात हा उपलब्ध आहे. वीवो Y95 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 439 ऑक्ट्रा कोर प्रोसेसरवर चालणारा पहिला स्मार्टफोन आहे. कंपनीने यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आणि फिंगर प्रिंट दिलंय. येणाऱ्या दिवसात यामध्ये आणखी बदल झालेले दिसतील. फोनमध्ये 20 एमपी एआय कॅपमे आणि फुल व्ह्यू डिस्प्ले दिला गेलायं.
वीवो Y95 ची भारतातील किंमत 16 हजार 990 रुपये असून अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम अशा सर्व सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. याशिवाय तुम्ही दुकानातूनही हा फोन खरेदी करू शकता. वीवो Y95 कंपनीच्या ई-स्टोअर वर देखील मिळेलं. हा नवा स्मार्टफोन 'मेक इन इंडिया' अंतर्गत ग्रेटर नोएडाच्या प्लांटमध्ये तयार केलं गेलंय. फोनच्या लॉंचिंगवेळी कंपनीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि बजाज फायनान्सचा 15 महिन्यांचा नो कॉस्ट ईएमआयची ऑफर दिली होती. फोनचा ईएमआय 1 हजार 133 रुपये प्रतिमाह सुरू होतोयं.
जर तुम्ही वीवो Y95 पेटीएमवरून खरेदी करताय तर त्यावर 1,500 रुपयांचं कॅशबॅक कूपन मिळतंय. रिलायन्स जिओ च्या ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर 4 हजार किंमतीचा 3TB डेटा मिळणार आहे. फोनची 64 जीबी इंटरनल स्टोरेज मायक्रो एसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.
ड्युयल सेटअप तसेच आर्टिफिशिअल लेंसचा कॅमेरा
फ्लैशसोबत अपर्चर एफ/2.0 सोबत 13 मेगापिक्सल प्रायमरी आणि अपर्चर एफ/2.4सोबत 2 मेगापिक्सल सेकंडरी सेंसर
सेल्फीसाठी AI फेस ब्यूटी फीचरसोबत 20 MP चा कॅमरा
6.22 इंच 1520x720 पिक्सल रिझॉल्यूशनचा एचडी प्लस वाटरड्रॉप नॉच डिस्प्ले
बॅक पॅनलला फिंगरप्रिंट सेंसर
4030 mAh ची बॅटरी