मुंबई : टेक्नॉलॉजीच्या या युगात प्रत्येक दिवस काही ना काही नवीन पाहायला मिळतंय. काही टेक्नॉलॉजिकल अपडेटस तर काही संपूर्ण तंत्रच बदलणारी अपडेटस तुमच्यावर येऊन आदळत असतात. यापैंकी तुम्ही आपल्याला खरंच उपयोगी पडतील अशा काही वस्तूंची स्मार्ट पद्धतीनं निवड करणं आवश्यक आहे. येत्या वर्षात अर्थात २०२० मध्ये तुम्हाला स्वत:सहीत पाणीही साफ करणाऱ्या बाटलीसोबतच ब्लूटूथ असलेले सनग्लासेस तुम्हाला बाजारात दिसणार आहेत. तर चला जाणून घेऊयात अशाच काही गॅझेटसबद्दल
बऱ्याचदा आपण घरातून निघताना आपल्यासोबत पाण्याची बाटली ठेवतो. ही बाटली वेळीच साफ केली नाही तर त्यातून दुर्गंध यायला सुरूवात होते. अर्थातच, अशा बाटलीतलं पाणी प्यायलात तर तुम्ही आजारी नाही पडणार तर काय होणार... पण, आता मात्र तुम्हाला आजारी पडावं लागणार नाही. कारण बाजारात अशी एक पाण्याची बाटली येतेय जी स्वत:ला साफ करेलच परंतु, या बाटलीतलं पाणीही स्वच्छ होईल. LARQ नं सेल्फ क्लिनिंग बॉटल लॉन्च केलीय. UV-C LED light चा वापर करत ही बाटली यात भरलेलं पाणीही स्वच्छ करते.
फोटोचं फॅड तरुणाईत किती भिनलंय हे इन्स्टाग्राम तुम्हाला सांगतंच... पण हेच फोटोंची कॉपी तुम्हाला हवी असेल तर... आणि तिही तितक्याच तातडीनं... पोलरॉइड वन स्टेप ब्लूटूथ इन्स्टंट कॅमेरा तुमची ही निकड भागवणार आहे. या गॅझेट़च्या सहाय्यानं फोटो काढल्यानंतर त्याची इन्स्टंट कॉपी तुमच्या हातात मिळू शकेल. हे छोटंसं गॅझेट तुम्ही आपल्यासोबत कुठेही कॅरी करू शकाल. या कॅमेराची खासियत म्हणजे ६० दिवसांपर्यंत याची बॅटरी बॅकअप मिळेल.
उन्हापासून डोळ्यांचं संरक्षण कॅमेराच तुम्हाला गाणी ऐकण्यासाठी उपयोगी ठरू शकला तर... ही काही आता असाध्य गोष्ट नाही. कारण BOSE ब्लूटूथ ऑडिओ सनग्लास नुकतेच लॉन्च करण्यात आलेत. हे एकच डिव्हाईस तुमच्या डोळ्यांचंही संरक्षण करेल आणि तुमचा फोनही ब्लूट़ूथला कनेक्ट करेल. याद्वारे तुम्ही गाणी ऐकू शकता किंवा नॉर्मल ब्लूटूथ डिव्हाईसच्या सुविधा तुम्हाला यात मिळतील.
घरात एखादा मसाजर असणं आता सामान्य गोष्ट झालीय. कंबरदुखी किंवा गुडघेदुखीसाठी oprah नं एक MIGIC HAND बॉडी मसाजर बाजारात आणलाय. याच्या सहाय्यानं मान, पाठ, कंबर, पाय, गुडघे अशा शरीराच्या प्रत्येक दुखऱ्या भागांना मसाज देण्याचं काम हा मसाजर करू शकेल. ज्यांच्या घरात वयोवृद्ध व्यक्ती आहेत, त्यांच्या घरात हा मसाजर जास्त उपयोगी ठरू शकेल.