xiaomi सोबत बिझनेस करण्याची संधी, प्रतिमहिना होईल चांगली कमाई

स्मार्टफोन तयार करणारी शाओमी कंपनीनीने बिजनेस करण्यासाठी इच्छूक असलेल्या लोकांसाठी एक चांगली संधी उपलब्ध केलेली आहे. आपण जर बिजनेस करण्यासाठी उत्सुक असाल तर कमी खर्चात Mi Store उघडू शकतात. 

Updated: Apr 25, 2019, 06:36 PM IST
xiaomi सोबत बिझनेस करण्याची संधी, प्रतिमहिना होईल चांगली कमाई  title=

मुंबई : स्मार्टफोन तयार करणारी शाओमी कंपनीनीने बिजनेस करण्यासाठी इच्छूक असलेल्या लोकांसाठी एक चांगली संधी उपलब्ध केलेली आहे. आपण जर बिजनेस करण्यासाठी उत्सुक असाल तर कमी खर्चात Mi Store उघडू शकतात. होय, शाओमीच्या वतीने, अलीकडेच असं सांगतिलं आहे की, या वर्षाच्या अखेरीस कंपनीकडे देशातील 10 हजार किरकोळ स्टोअर असतील. ऑफलाइन मार्केटसह त्यांच्या व्यवसायात 50 टक्के हिस्सा असेल. 2014 मध्ये ऑनलाइन ब्रँडमध्ये पाऊल टाकणारे शाओमी Mi Studio च्या नावावर किरकोळ दुकाने चालू करत आहेत. 

शाओमीचे उपाध्यक्ष मनू जैन यांनी सांगितलं की, दोन वर्षांपूर्वी आम्हाला वाटले की ऑनलाइन विक्रीचा आमचा वाटा 50 टक्के आहे. मात्र आमच्या ऑफलाइन विक्री समान नाहीत. या कारणास्तव, आम्ही ऑफलाइन विस्तृत करायला सुरुवात केली आहे. जैन म्हणाले, 2019 च्या अखेरीस चार ऑफलाइन चॅनलद्वारे 10 हजारहून अधिक किरकोळ दुकाने उघडण्याचा आमचा उद्देश आहे. वर्षाच्या अखेरीस, ऑफलाइन माध्यमांमध्ये आमच्या स्मार्टफोनच्या एकूण विक्रीत 50 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे.

शाओमी इंडियाच्या वतीने, असे म्हटले आहे की, देशाच्या 19 राज्यांत 1 हजाराहून अधिक स्टोअर उघडून 2 हजाराहून अधिक लोकांना रोजगार पुरवले गेले आहे. जैन म्हणाले की, ऑनलाइन बाजारपेठ वाढण्याची शक्यता आता मर्यादीत आहे. त्यामुळे कंपनी ऑफलाइन मार्केटमध्ये लक्ष देत आहे. आता कंपनीचे ऑफलाइन मार्केट शेअर 20 टक्के आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये देशात 500 Mi Store  उघडण्याची योजना शाओमीने सांगितली होती.

या वर्षाच्या अखेरीस कंपनीने ग्रामीण भागातील 5 हजार किरकोळ दुकाने उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मोठ्या शहरांमध्ये आणि Mi Home सारख्या महानगरांमध्येही Mi Store आहेत. 1 हजार Mi Store जोडल्यानंतर, शाओमी इंडियाने Mi Studio जाहीर केले आहे.  Mi Studio ही कंपनीच्या किरकोळ चॅनेलचा एक भाग आहे. सध्या ते 400 ते 600 चौरस फूट सरासरी बंगळूरु आणि मुंबई येथे आहेत.
xiaomi सोबत बिझनेस करण्याची संधी, प्रतिमहिना होईल चांगली कमाई