मुंबई : सोनी इंडिया प्रा. लिमिटेडनं गुरुवारी फूल फ्रेम इंटरचेंजेबल लेन्स (पूर्ण फ्रेमसहीत एकमेकांमध्ये बदलता येणारा) कॅमेरा 'अल्फा ९ टू' हा कॅमेरा भारतात लॉन्च करण्याची घोषणा केलीय. 'अल्फा ९ टू' गुरुवारपासून संपूर्ण देशातील प्रमुख रिटेल काउंटरसहीत सोनी सेंटर आणि इलेक्ट्रॉनिक स्टोअर्सवर उपलब्ध झालाय.
'अल्फा-९' या आपल्या मूळच्या कॅमेऱ्यावर 'अल्फा ९ टू' आधारीत असल्याचं कंपनीनं म्हटलंय. यामध्ये ग्राऊंड ब्रेकिंग स्पीड चांगला असेल. सोबतच यामध्ये ऑटो फोकस आणि ऑटो एक्सपोजर ट्रॅकिंगचीही सुविधा आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या कॅमेऱ्याच्या सहाय्यानं प्रति सेकंद २० फ्रेमसोबत सलग फोटो काढता येऊ शकतील.
मॅकेनिकल शटरसोबत १० एफपीएसपर्यंत सलग व्हिडिओ शूट करण्यासाठी हा कॅमेरा वापरता येऊ शकतो.
नव्या 'अल्फा ९ टू'मध्ये ऍडव्हान्स फोकस सिस्टम आहे. यामध्ये, ६९३ फोकल - प्लेन फेज - डिटेक्शन एएफ पॉईंट देण्यात आलाय... जो जवळपास ९३ टक्के फोटोचं क्षेत्र कव्हर करतो. सोबतच यात ४२५ कॉन्ट्रास्ट एएफ पॉईंटचाही समावेश आहे. नव्या कॅमेऱ्यात मॅकेनिकल शटरसोबत १० एफपीएसपर्यंत शूट करण्यासाठी बनवण्यात आलाय.
अल्फा-९ पेक्षा दुप्पट गतीनं काम करण्यासाठी हा कॅमेरा सक्षम असेल, असा दावा कंपनीनं केलाय. या कॅमेऱ्याची भारतातील किंमत ३,९९,९९० रुपये असेल.