मुंबई : सॅमसंग लवकरच 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. स्मार्टफोनचा कॉन्सेप्ट व्हिडिओ समोर आला आहे, जो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. सॅमसंग नेक्स्ट जनरेशन Galaxy S-Series फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम करत आहे आणि आगामी स्मार्टफोनचे तपशील यापूर्वीच अनेक वेळा ऑनलाइन लीक झाले आहेत. Galaxy S23 Ultra वर 200MP कॅमेरा सेन्सर असण्याची चर्चा आहे. आता, Technizo चा एक नवीन कॉन्सेप्ट व्हिडिओ दाखवतो की आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनचा कॅमेरा मॉड्यूल कसा दिसेल. Samsung Galaxy S23 Ultra चे सर्व फीचर्स जाणून घेऊ या...
Samsung Galaxy S23 Ultra मध्ये 200MP कॅमेरा असेल
रिपोर्ट्सनुसार, Samsung Galaxy S23 Ultra मध्ये 200-megapixel Samsung HM1 ISOCELL सेंसर असेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 1 सारखे प्रोसेसर 200MP पर्यंत कमाल सिंगल-कॅमेरा रिझोल्यूशनला सपोर्ट देतात.
Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus या लाइनअपमधील दोन इतर मॉडेल्समध्ये 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर असण्याची अपेक्षा आहे. तिन्ही मॉडेल्स बॅक पॅनलवर मल्टिपल कॅमेरा सेन्सर्ससह येतील.
Samsung Galaxy S23 Ultra चा डिस्प्ले
Galaxy S23 मालिका स्मार्टफोन 10Hz ते 120Hz च्या डायनॅमिक स्क्रीन रिफ्रेश रेटसह LTPO डिस्प्लेसह येतील. स्मार्टफोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर आणि सॅमसंगच्या स्वतःच्या Exynos फ्लॅगशिप चिपसेटचा सपोर्ट असेल.