मुंबई : टेलिकॉम कंपन्यांना आणखी एक धक्का देत रिलायन्स जिओने सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च करत आहे. रिलायंस जिओच्या या मोबाईलमुळे आता मोबाईलच्या मार्केटमध्ये स्पर्धा वाढणार आहे. रिलायंस जिओ 4जी सपोर्ट करणारा फोन लॉन्च कर करत आहे.
एका वेबसाईने दिलेल्या माहितीनुसार या फोनची किंमत १७३४ रुपये ते १८०० पर्यंत असू शकते. रिलायंसचं लक्ष्य भारतातील लोअर मीडिल क्लासपर्यंत पोहोण्याचं आहे. आता जिओची सर्विस पोहोचवण्यासाठी याचा कंपनीला फायदा होणार आहे. रिलायंस मोबाईलचे दोन वेरिएंट्स लॉन्च करणार आहे.
रिलायंस जिओ या मोबाईलमध्ये क्वालकॉम आणि स्प्रेडट्रम प्रोसेसरचा वापर करणार आहे. क्वालकॉम प्रोसेसर असणारा मोबाईल १७३४ तर स्प्रेडट्रम मोबाईलची किंमत जवळपास १८०० रुपये असणार आहे.