रिलायन्स जिओच्या या ऑफर तुम्हाला माहिती आहेत का?

रिलायन्स जिओ जवळपास रोजच नव्या ऑफर घेऊन येत असतं. पण रिलायन्स जिओची सगळ्यात स्वस्त ऑफर १९ रुपयांची आहे.

Updated: Jul 20, 2017, 08:05 PM IST
रिलायन्स जिओच्या या ऑफर तुम्हाला माहिती आहेत का?  title=

मुंबई : रिलायन्स जिओ जवळपास रोजच नव्या ऑफर घेऊन येत असतं. पण रिलायन्स जिओची सगळ्यात स्वस्त ऑफर १९ रुपयांची आहे. एक दिवसाची व्हॅलिडिटी असलेल्या या ऑफरमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 200MB 4Gडेटा मिळणार आहे.

३४९ रुपयांचा मेगा प्लॅन

याशिवाय रिलायन्स जिओचा ३४९ रुपयांचा मेगा प्लॅनमध्ये ग्राहकांना 20GB डेटा मिळतो. ग्राहकांना हा डेटा कमीतकमी एक तर जास्तीत जास्त ५६ दिवसांमध्ये संपवावा लागतो. या ऑफरमध्ये ग्राहकांचा डेटा संपल्यावरही त्यांना अनलिमिटेड डेटा वापरण्यात येईल पण त्याचा स्पीड 128kbps एवढा असणार आहे.

हे आहेत जिओचे आणखी वेगळे प्लॅन

या प्लॅन शिवाय जिओच्या प्रिपेड ग्राहकांसाठी ४९, ९६, १४९, ३०९, ३४९, ९९९, १९९९ आणि ४,९९९ रुपयांचे प्लॅनही उपलब्ध आहेत. काहीच दिवसांपूर्वी जिओनं ३९९ रुपयंची धनधनाधन ऑफर लॉन्च केली होती. यामध्ये ग्राहकांना ८४ दिवसांसाठी अनलिमिटेड इंटरनेट आणि व्हॉईस कॉलिंग मिळत आहे.