'ट्राय'नुसार, ही मोबाईल कंपनी देतेय सर्वोत्तम 'डाटा स्पीड'!

रिलायन्स जिओनं सरासरी मासिक डाटा स्पीडमध्ये इतर मोबाईल कंपन्यांची सुट्टी केलीय. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (ट्राय) मंगळवारी जाहीर केलेल्या आकड्यांवरून हे स्पष्ट होतंय. 

Updated: Sep 5, 2017, 05:07 PM IST
'ट्राय'नुसार, ही मोबाईल कंपनी देतेय सर्वोत्तम 'डाटा स्पीड'! title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओनं सरासरी मासिक डाटा स्पीडमध्ये इतर मोबाईल कंपन्यांची सुट्टी केलीय. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (ट्राय) मंगळवारी जाहीर केलेल्या आकड्यांवरून हे स्पष्ट होतंय. 

डाटा स्पीडमध्ये रिल्यायन्स जिओ सर्वात वरचढ ठरलीय. उल्लेखनीय म्हणजे, मंगळवारी ५ सप्टेंबर रोजीच जिओनं आपल्या व्यावसायिक सेवेला एक वर्ष पूर्ण केलंय.

सरासरी डाटा स्पीडमध्ये ट्रायच्या स्पीड चार्टवर गेल्या सात महिन्यांपासून जिओनं पहिल्या क्रमांकावर स्थान कायम ठेवलंय. भारती एअरटेल, व्होडाफोन इंडिया आणि आयडिया या कित्येक वर्षांपासून या क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या कंपन्या मात्र यंदा मागे पडल्यात. 

जुलैमध्ये जिओचं डाऊनलोड स्पीड १८.३३१ एमबीपी होता, तर एअरटेलचा स्पीड याच्या जवळपास निम्मा म्हणजेच ९.२६६ एमबीपीएस होता. आयडिया सेल्युलर ८.८३३ एमबीपीएस तर व्होडाफोन इंडियाचा ९.३२५ एमबीपीएस स्पीड होता.