'जियो'ची फुटबॉल ऑफर, २,२०० चं कॅशबॅक

या ऑफरमधून सर्व ग्राहकांना २,२०० रुपयांचे कॅशबॅक मिळणार आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 17, 2018, 08:21 AM IST
 'जियो'ची फुटबॉल ऑफर, २,२०० चं कॅशबॅक title=

मुंबई : 'जियो' आणत असलेल्या नवनव्या ऑफर्समुळे ग्राहकांचा जियोकडे जाण्याचा कल वाढतोय. इतर कंपन्याही स्पर्धेत राहण्यासाठी विविध ऑफर आणताय. आता पुन्हा जियोने आणखी एक धमाका केलायं रिलयान्स जियोने शुक्रवारी मध्यरात्री ग्राहकांसाठी 'जियो फुटबॉल ऑफर' आणलीयं.

या ऑफरमधून सर्व ग्राहकांना (वर्तमान आणि नव्या) २,२०० रुपयांचे कॅशबॅक मिळणार आहे. आपल्या ४ जी डिवाइसला १९८ रुपये/ २९९ रु. प्रिपेड प्लानप्रमाणेच ३१ मार्चपर्यंत जियो नेटवर्क्सना उपलब्ध होईल. 
 
 १९८/२९९ रुपयांच्या रिचार्जनंतर ५० रुपयांचे ४४ वाऊचर दिले जातील. हे वाऊचर माय जियो अॅपवर रिचार्ज करुन वापरात  आणता येतील. 

कोणासाठी ऑफर ? 

जियो नेटवर्कवर १५ फेब्रुवारीपर्यंत आणि याआधी पहिल्यांदाच सक्रिय होत असतील त्यांच्यासाठी  ही ऑफर असणार आहे.