या भारतीयाने लावला ई-मेलचा शोध

इंटरनेटचं जाळं हे सगळीकडेच पसरलं आहे. मोबाइलप्रमाणेच इंटरनेट देखील आता जीवनाचा महत्वाचा भाग बनत चालला आहे.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 15, 2017, 05:56 PM IST
या भारतीयाने लावला ई-मेलचा शोध title=

मुंबई : इंटरनेटचं जाळं हे सगळीकडेच पसरलं आहे. मोबाइलप्रमाणेच इंटरनेट देखील आता जीवनाचा महत्वाचा भाग बनत चालला आहे.

देशी - विदेशी संपर्क साधण्यासाठी आज वेगवेगळ्या पर्यायांबोरबर ई-मेल ही देखील एक महत्वाची प्रणाली मानली जाते. आतापर्यंत आपण पाहिलं आहे की, अनेक अॅप्सचे शोध हे परदेशी व्यक्तींने लावले आहेत. मात्र संदेश पाठवण्यासाठी जो ई-मेल वापरला जातो तो मात्र एका भारतीयाने तयार केला आहे... कौतुक वाटलं ना... जाणून घेऊया या भारतीय व्यक्तीबद्दल.....

ई-मेल निर्मात्याचा नावं आहे वी ए शिवा अय्यादुरई. २ डिसेंबर १९६३ रोजी मुंबईत जन्नमलेल्या या शिवाचं छोटसं कुटुंब. घरी आई आई मीनाक्षी अय्यादुरई, वडील  वी. अय्यादुरई, आणि बहीण डॉ. उमा वी. अय्यादुरई असा शिवाचा छोटासा परिवार .छोटा शिवा सात वर्षाचा असताना आई बाबांसोबत अमेरिकेला गेला . 

न्यू जर्सीच्या यूनिवर्सिटी ऑफ मेडिसीन आणि डेन्टीस्ट्रीमध्ये असताना शिवा अय्यादुराई यांच्या चिकाटी आणि कॉम्युटर शास्त्र शिकण्याच्या वेडाने प्रभावित होऊन कॉम्प्युटर लॅबोरेटरी नेटवर्कचे संचालक डॉ. लेस्ली मिशेलसन यांनी तत्कालीन कागदी पत्रव्यवहाराला पर्यायी असा कॉम्प्युटर प्रोग्राम बनवायला सांगण्यात आलं. ध्येयवेड्या या शिवाने आतंर कार्यालयीन पत्रव्यवहाराचा दिवस-रात्र बारकाईने अभ्यास केला. या यंत्रणेचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर इनबॉक्स, आऊटबॉक्स, ड्राफ्ट, कार्बन कॉपी, फोल्डर, अॅड्रेस बुक, अटॅचमेंटसाठी वापरायच्या पेपरक्लिप्स याचा इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीममध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी तब्बल ५०  हजार लाईन्सचा प्रोग्राम कोड तयार केला. हा प्रोग्राम कोड म्हणजेच आज आपण वापरत असलेलं 'ई-मेल'.

वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी शिवाने ई-मेल प्रोग्रामची निर्मिती केली. त्यावेळी त्याने लावलेल्या एवढ्या मोठ्या शोधाच्या कॉपीराईटचा देखील विचार केला नाही. १९७८ मध्ये जरी ईमेलचा प्रोग्राम तयार केला असला तरी ईमेलचा प्रवर्तक किंवा जन्मदात म्हणून त्याला त्याचं श्रेय मिळण्यासाठी आणखी चार वर्षांचा अवधी जावा लागला. आणि तब्बल ६ वर्षाने म्हणजे ३०  ऑगस्ट १९८२  रोजी अमेरिकी प्रशासनाने शिवा अय्यादुराई यानेच ईमेलचा शोध लावल्याचं जाहीर केलं. आणि तेव्हापासून ते आजपर्यंत आणि यापुढे देखील आपण ई-मेलचा सर्रास वापर करत राहणार आहोत. त्यामुळे या ई-मेल जनकाला आमचा मानाचा स ला म.....