Xiaomi Redmi Note 5Aचे फिचर्स- किंमत लिक

स्मार्टफोन कंपनी शाओमी लवकरच Redmi Note 5A हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे.

Updated: Aug 15, 2017, 05:02 PM IST
Xiaomi Redmi Note 5Aचे फिचर्स- किंमत लिक title=

मुंबई : स्मार्टफोन कंपनी शाओमी लवकरच Redmi Note 5A हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. पण लॉन्च आधीच शाओमीच्या या फोनची किंमत आणि त्याचे फिचर्स लिक झाले आहेत. शाओमीचा हा स्मार्टफोन २१ ऑगस्टला भारतात लॉन्च होणार आहे तसंच याची किंमत जवळपास ९,६०० रुपये असणार आहे, अशी बातमी एका वेबसाईटनं दिली आहे.

या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा फूल एचडी डिसप्ले असलेल्या या फोनचं रिझोल्यूशन 1080X1920 एवढं आहे. या फोनमध्ये 2GB रॅम आणि १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल असं सांगण्यात येतंय. तसंच 3,080 mAHची बॅटरीही या स्मार्टफोनला देण्यात आली आहे.