Ola Electric Scooterच्या विक्रीची तारीख बदलली... जाणून घ्या कधी आणि कशी सुरू होणार विक्री

विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही टेस्ट ड्राइव्ह घेऊन ओला इलेक्ट्रिक स्कूटरची ऑर्डर रद्द करू शकता.

Updated: Sep 11, 2021, 07:14 PM IST
Ola Electric Scooterच्या विक्रीची तारीख बदलली... जाणून घ्या कधी आणि कशी सुरू होणार विक्री title=

मुंबई : काही काळापासून चर्चेत असलेल्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीसाठी ग्राहकांना थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे. वास्तविक त्याची विक्री 8 सप्टेंबरपासून सुरू होणार होती, परंतु या स्कूटरमधील तांत्रिक बिघाडी आल्या, ज्यामुळे आता ओला इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून खेद व्यक्त करत ग्राहकांना याची माहिती दिली.

स्कूटरची किंमत

ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या एस 1 व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 99 हजार 999 रुपये आहे, तर तुम्ही स्कूटरचे S1 Pro प्रो व्हेरिएंट 1 लाख 29 हजार 999 रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत घरी आणू शकता.

कंपनीच्या मते, ग्राहकांना या स्कूटरची डिलिव्हरीची वाट पाहावी लागेल. ऑक्टोबरपासून या स्कूटरची डिलिव्हरी दिली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही टेस्ट ड्राइव्ह घेऊन ओला इलेक्ट्रिक स्कूटरची ऑर्डर रद्द करू शकता.

फायनान्सची सुविधाही आहे

ओला इलेक्ट्रिकने म्हटले होते की, S1 स्कूटरचा ईएमआय दरमहा 2 हजार 999 रुपयांपासून सुरू होईल. त्याच वेळी, S1 pro ची ईएमआय 3 हजार 199 रुपयांपासून सुरू होईल. दुसरीकडे, जर तुम्ही या स्कूटरला फायनॅन्स केला, तर OFS म्हणजेच ओला फायनान्शियल सर्व्हिसेसने एसडीला फायनॅन्स करण्यासाठी IDFC फर्स्ट बँक, एचडीएफसी आणि टाटा कॅपिटलसह अनेक बँकांशी हातमिळवणी केली आहे.

स्कूटरचे फीचर्स

या स्कूटरमध्ये ऑर्टिफिशियल साउंड सिस्टम, 4G कनेक्टिविटी सिस्टम त्यासोबतचं तुम्ही तुमचा स्मार्टफोन सुद्घा कनेक्ट करू शकता. 'Hey Ola' बोल्यावर ही ई-स्कूटर तुमचं सगळं काही ऐकणार आहे. ola इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.9 kWh क्षमतेचा बैटरी पैक असणार आहे. ज्यामध्ये तुम्ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 181 किलोमीटर चालवू शकता.

6 तासात हा बैटरी पैक पुर्ण चार्ज होईल. या ई- स्कूटरचा टॉप स्पीड प्रतितास 115 किलोमीटर आहे, ज्यामध्ये तीन वेग-वेगळे ड्राइविंग मोड्स आहेत-नॉर्मल, स्पोर्ट आणि हाइपर. बँकच्या ऑफर्सनुसार S1 इलेक्ट्रिक स्कूटर 2,999 रुपये दरमहा आणि S1 pro ही 3,199 रुपये दरमहाच्या EMIवर  खरेदी करू शकता.