NPCI On UPI Payments Methods: भारतामध्ये पैशांच्या व्यवहारासाठी यूपीआय पमेंटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. दरदिवशी लाखो युजर्स यूपीआयचा वापर करतात. यूपीआयवर देखरेख ठेवणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआय (NPCI) च्या रिपोर्टनुसार, देशभरातील विविध यूपीआय प्लॅटफॉर्मवर अरबो डॉलरचा व्यवहार होतो. हे व्यवहार पूर्णपणे सुरक्षित असल्याने यूपीआय यूजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. यूपीआय पेमेंट सिस्टिम अधिक सुरक्षित करण्यासाठी एनपीसीआय आपली यंत्रणा अपग्रेड करत असते. आता कोट्यावधी यूजर्ससाठी एनपीसीआयने मोठी अपडेट दिली आहे. यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही एखाद्याला पैसे पाठवत असता तेव्हा तुम्हाला पासवर्ड टाकावा लागतो. आता हा पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. कारण एनपीसीआयने पासवर्ड सिस्टिममध्ये 2 महत्वाचे बदल करत आहेत. त्यानुसार फेस आयडी आणि फिंगप्रिंट हे पर्याय यूजर्सना उपलब्ध होणार आहे. यामुळे तुमचे यूपीआय व्यवहार आधीपेक्षा अधिक सुरक्षित होणार आहेत.
नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, यूपीआय पैशांच्या दैनंदिन व्यवहारासाठी बायोमेट्रीक व्हेरिफिकेशन मेथड लाहू करण्यासाठी कंपन्यांशी बातचीत करत आहे. डिजिटल व्यवहार करताना अॅडिशनल फॅक्टर ऑथिंटिकेशन (AFA) चे पर्याय शोधण्यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानंतर हे पाऊल उचलण्यात आले होते.
यूपीआय व्यवहार करताना यूजर्सच्या सुरक्षेसाठी पारंपारीक पिन आणि पासवर्डच्या पद्धतीवर विचार करायला हवा, असा सल्ला आरबीआयने दिला होता. स्टार्टअपसोबत एनपीसीआयच्या सध्याच्या चर्चा या संभाव्य भागीदारीच्या आर्थिक आणि कायदेशीर बाबींवर केंद्रीत आहेत. सुरुवातील पिन बेस आणि बायोमॅट्रीक अशा दोन्ही पद्धती उपलब्ध करुन दिल्या जातील. यानंतर व्यवहार सुरक्षित करण्यासाठी आणखी पर्याय आणले जाणार आहेत. तुमच्या स्मार्टफोनमध्ये बायोमॅट्रीक सुविधेचा वापर करण्यासाठी सर्वातआधी तुम्हाला यूपीआय पेमेंट व्हेरिफाईड करण्याची परवानगी मागितली जाईल. अॅण्ड्रॉइड डिव्हाइसवर फिंगरप्रिंट सेंसर किंवा आयफोनवर फेस आयडीच्या माध्यमातून तुम्ही यूपीआय करु शकता.
यूपीआय व्यवहार करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी बायोमॅट्रीकचा पर्याय स्वीकरणे आवश्यक आहे. ही सुविधा प्रत्यक्षात कधी वापरता येईल? याची तारीख अद्याप समोर आली नाहीय. तसेच यूपीआय अॅप हा पर्याय स्वीकारतील का?हेदेखील अद्याप सांगता येत नाही. सध्यातरी गुगल पे, फोन पे, अमेझॉन पे आणि पेटीएस सारखे लोकप्पिय प्लॅटफॉर्मनी यासाठी पुढाकार घेतलाय.त्यामुळे जसजशा तांत्रिक बाबी अंमलात येतील तसे युजर्सना पिन किंवा बायोमॅट्रीक्सचा पर्याय निवडता येणार आहे. सध्यातरी एनपीसीआय या संदर्भात कंपन्यांशी चर्चा करत आहे. त्यामुळे यासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.