मोबाईलच्या किंमतीत वाढ, हे आहे कारण

मोबाईलवरील जीएसटी १८ टक्क्यांवर

Updated: Mar 14, 2020, 07:19 PM IST
मोबाईलच्या किंमतीत वाढ, हे आहे कारण  title=

मुंबई : मोबाईल ही गरजेची वस्तू आता महागली आहे. मोबाईलवरील जीएसटी १८ टक्क्यांवर गेल्याने मोबाईल फोन महागला आहे. मोबाईल फोनचे सुटे भाग देखील महागले आहेत. मोबाईल खरेदी करताना तुम्हाला आता खिसा खाली करावा लागणार आहे. 

 

अर्थमंत्र्यांची घोषणा 

मोबाईलवरील जीएसटी १२ टक्क्यांवरुन १८ टक्क्यांवर नेण्यात आलाय. जीएसटी काऊंसिलनं हा निर्णय घेतलाय. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे.