Car च्या स्पीडोमीटरवर दिसणाऱ्या प्रत्येक लाईटचा अर्थ माहितीये? लक्ष द्या नाहीतर मोठं नुकसान अटळ

car health : तुमच्याकडेही कार आहे का? ती बरीच वर्षे सुस्थितीत राहावी असं तुम्हालाही वाटतंय का? तर, तुम्हीही काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. 

Updated: Dec 10, 2022, 11:49 AM IST
Car च्या स्पीडोमीटरवर दिसणाऱ्या प्रत्येक लाईटचा अर्थ माहितीये? लक्ष द्या नाहीतर मोठं नुकसान अटळ  title=
know the meaning of Car Warning Lights latest auto news

Auto News : (Dashboard Warning Lights Explained) जसं आपण एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्याजवळ असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची, यंत्राची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मग ते एखादं उपकरण असो किंवा आणखी काही. अगदी कारसुद्धा याला अपवाद नाही. तुमच्याकडेही कार आहे का? ती बरीच वर्षे सुस्थितीत राहावी असं तुम्हालाही वाटतंय का? तर, तुम्हीही काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. अर्थात तुमचं कारकडे लक्ष नसलं तरीही ती मात्र जरासाही बिघाड झाल्यास तुम्हाला सुचित करत असते. कशी? (know the meaning of Car Warning Lights latest auto news)

कारमध्ये असते खास यंत्रणा 

कारच्या डॅशबोर्डमध्ये अनेक लहानसहान इंडिकेटर असतात, त्यावर काही लाईट्सही असतात. प्रत्येक लाईटचा वेगळा रंग तिथे आपल्याला पाहायला मिळतो. लाईटचे हे वेगवेगळे रंग शोभेसाठी नसतात, तर त्यांचाही एक अर्थ असतो. प्रत्येक लाईट लागणं म्हणजे कोणता न कोणता इशाराच असतो. यापैकी 5 महत्त्वाच्या लाईट्सविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. 

Engine Temperature Warning Light
ही लाईट लागताच कार जास्त गरम होत असल्याचं लक्षात घ्यावं. याचा थेट संबंध कारच्या कुलंटशी असतो ज्यामुळं इंजिन कायम थंड राहतं. कुलंट संपणं किंवा ते व्यवस्थित काम न करणं यामुळं कारच्या इंजिनाचं तापमान वाढू शकतं. तुम्हाला असा इशारा मिळाल्यास कार बंद करून इंजिन थंड होऊद्या. कुलंट बॉक्समध्ये पाणी भरा आणि आदी कार मॅकॅनिकपाशी न्या. 

Battery Alert Light 
ही लाईट तुम्हाला कारमध्ये चार्जिंग सिस्टीम व्यवस्थित काम करत नसल्याचा इशारा देते. बॅटरी जागची हलणं, खबार अल्टरनेटर असणं किंवा एखादी दुसरीच अडचण असणं अशा अडचणी असू शकतात. अशा वेळी अनेकदा कार सुरुच होत नाही, त्यावेळी मग कारची बॅटरी थोडी हलवून पाहावी, जर ते करूनही कार सुरु होत नसल्यास तिला सर्विस सेंटरला न्या. 

हेसुद्धा वाचा : Vehicle Sales: नोव्हेंबर महिन्यात ऑटो क्षेत्रात बूमबूम, सर्वाधिक नवी वाहनं खरेदीमागचं FADA ने सांगितलं कारण

 

 Oil Pressure Warning
कारमध्ये  Oil Pressure यंत्रणेत बिघाड झाल्यास ही लाईट इशारा देऊ शकते. इंजिन ऑईल कार इंजिनच्या आत असणाऱ्या भागाला सुयोग्य ठेवण्याचं काम करतं. त्यातच जर हा लाईट सुरु झाल्यास असं समजा की इंजिन ऑईल कमी झालं आहे किंवा ते इंजिनपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये. कारमध्ये ऑईल लीकेज तर नाही, हेसुद्धा यावेळी लक्षात घ्या. 

Airbag Indicator Light 
एअरबँग इंडिकेटर लाईट सुरु झाल्यास कारमध्ये असणाऱ्या कोणत्यातरी एअरबॅगमध्ये बिघाड असल्याचं लक्षात येतं. यासाठी तुम्ही तातडीनं ती यंत्रणा व्यवस्थित करुन घ्या. अपघातादरम्यान एअरबॅगमुळं मोठी हानी वाचते. त्यामुळं Airbag Indicator Light कडे अजिबातच दुर्लक्ष करू नका.