Gorakhpur students special shoes : गोरखपूरमध्ये इंजिनीयरिंग कॉलेजमधील (Gorakhpur Engineering College) विद्यार्थ्यांनी एक बूट (Shoes) तयार केला आहे. या बुटाचं वैशिष्ट म्हणजे, कोणत्याही कठीण प्रसंगी त्या व्यक्तीचं आयुष्य सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. हा बूट तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जीपीएस ट्रॅकर (GPS Tracker), हार्टबीट सेंसर (Heartbeat Sensor), जीएसएम सिम (GPS Sim), चिप (Chip), तार, मोबाइल (Mobile) तसंच इतर गोष्टींचा वापर केला आहे.
विद्यार्थ्यांनी हा बूट यासाठी तयार केलाय, जेणेकरून लहान मुलांचं अपहरण रोखलं जाईल, भूकंपासह इतर आपत्तींमध्ये लोकांचे जीवन सुरक्षित राहवं. हा बूट घातला तर तो व्यक्ती माणूस ढिगाऱ्याखाली दबला गेला तर त्याला सहज शोधून बाहेर काढता येईल. त्याचप्रमाणे एखाद्या मुलाचं अपहरण झालं तरं त्याचे लोकेशन सहज मिळण्यास मदत करू शकते. डोंगराळ तसंच बर्फाच्छादित प्रदेशामध्ये वादळात एखादी व्यक्ती अडकली तर त्यालाही सहजपणे शोधता येऊ शकतं.
स्मार्ट शू बनवणारा विद्यार्थी आदित्य सिंह याने सांगितले की, आम्ही बनवलेल्या शूमच्या आत जीपीएस ट्रॅकर, हार्ट बीट सेन्सर, तापमान सेन्सर तसंच जीएसएम मॉडेल या गोष्टींशी कनेक्ट केलं आहे.
आदित्य पुढे म्हणाला की, जर तुम्ही हा शूज घातला असेल आणि तुम्ही पॅनिक सिच्युएशनमध्ये आलात तर पालकांकडे किंवा पोलिसांकडे नोटीफिकेशन कॉल जाईल. याद्वारे एखादा लहान मुलगा किंवा महिला अडचणीत आहे, हे समजू शकेल.
हा शूज तयार करणारा अजून एक विद्यार्थी शुभम आहे. शुभमच्या सांगण्यानुसार, आम्ही लोकांच्या सुरक्षिततेसाठी हे शूज बनवले आहेत. शूजच्या टेक्नॉलॉजीविषयी विद्यार्थ्याने सांगितलं की, ज्या व्यक्तीने हा शूज घातला असेल तो जर नर्व्हस झालो तर आपल्या पायाचा तळवा थंड होतो. अशा स्थितीत शूजमध्ये बसवलेल्या टेम्परेचर सेन्सरद्वारे तापमानाची जाणीव होते. याचद्वारे पालकांना जीपीएस मोडमध्ये कॉल जातो. त्यानंतर जीपीएसच्या माध्यमातून मुलांचा शोध घेणं सोपं होणार आहे.