Jio Recharge Plans : वर्षभर नवीन रिचार्ज करण्याची गरज नाही, पाहा Jio ची 'ही' खास ऑफर

रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनी पैकी एक आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने नवनवीन प्लान्स ऑफर करत असते. अशातच आता रिलायन्स जिओच्या ४४ कोटी युजर्संसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

Updated: Aug 11, 2022, 04:41 PM IST
Jio Recharge Plans : वर्षभर नवीन रिचार्ज करण्याची गरज नाही, पाहा Jio ची 'ही' खास ऑफर title=

मुंबई: रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनी पैकी एक आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने नवनवीन प्लान्स ऑफर करत असते. अशातच आता रिलायन्स जिओच्या ४४ कोटी युजर्संसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. पुन्हा रिचार्ज करण्याचा त्रास टाळायचा असेल तर तुम्ही वार्षिक योजना वापरून पाहू शकता. एका वेळी पैसे खर्च करताना या योजना नक्कीच महाग वाटतात. जिओ तीन वार्षिक रिचार्ज योजना ऑफर करते. यापैकी, दोन रिचार्ज 365 दिवसांच्या वैधतेसह येतात. तर एका प्लॅनमध्ये तुम्हाला 336 दिवसांची वैधता मिळेल.   

कंपनीने सेलिब्रेशन ऑफरसोबतच नवीन २९९९ रूपयांचा नवीन प्लॅन लॉंच केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे हा कंपनीचा एकमेव असा प्लॅन आहे की ज्यामध्ये दिवसाला २.५ जीबी डेटा मिळणार आहे. तर या प्लॅनची वैधता ३६५ दिवसांची आहे. म्हणजेच या एका सिंगल रिचार्जमुळे संपूर्ण वर्षभराची चिंता मिटणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये युजर्संना अनेक वेगवेगळे फायदे देखील मिळणार आहे.

२९९९ च्या प्लॅनमध्ये अनेक फायदे
दरम्यान, हा प्लॅन वर्षभराची वैधता असलेला एकमेव प्लॅन आहे. म्हणजेच २९९९ रूपयेच्या एका रिचार्वर ३६४ दिवसांपर्यंत वेगळा रिचार्ज करण्याची गरज नाही. या प्लॅनमध्ये प्रत्येक दिवशी २.५ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच वर्षभरात एकूण या प्लॅनमध्ये ९१२. जीबी डेटा दिला जाईल. लक्षणीय बाब म्हणजे इंटरनेटचे डेली लिमिट संपल्यानंतर देखील ६४ kbps च्या वेगाने इंटरनेट चालेल.  दररोज १०० एसएमएस देखील दिले जातील. जिओच्या लोकप्रिय ॲप्स जसे की जिओ टिव्ही (Jio TV), जिओ सिनेमा (Jio Cinema), जिओ सुरक्षा (Jio Security), जिओ क्लाउड (Jio Cloud) आणि इतरांसाठी सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध असेल.

१२० रुपयांमध्ये वर्षभर ५०० एमबी (MB) अतिरिक्त (Extra) डेटा

जिओच्या या प्लॅनमध्ये ८.२२ रुपयाच्या प्रत्येक दिवशीच्या खर्चाने ३६५ दिवसांसाठी २.५ जीबी डेटा मिळेल. तर ३६५ दिवसांसाठी प्रत्येक दिवशी २ जीबी डेटासह कंपनीच्या प्लॅनची ​​किंमत २८७९ रुपये आहे. म्हणजेच १२० रुपये अधिक भरल्यास, युजर्संना ३६५ दिवसांसाठी दररोज ५०० एमबी (MB) अधिक डेटा मिळेल. एकूण एका वर्षात १८२.५ जीबी डेटा उपलब्ध होणार आहे.