जिओ 15 ऑगस्टला करणार मोठी घोषणा

स्वातंत्र्य दिनी रिलायंस कंपनीची खूशखबर

Updated: Aug 13, 2018, 01:34 PM IST
जिओ 15 ऑगस्टला करणार मोठी घोषणा title=

मुंबई : यंदाच्या स्वातंत्र्य दिनी रिलायंस कंपनी आपला जिओ फोन 2 लॉन्च करणार आहे. हा फोन 4G फोन असून यामध्ये अनेक फीचर्स असणार आहेत. फिजिकल कीपॅड या मोबाईलमध्ये असणार आहे. सोबतट या फोनमध्ये व्हॉट्सअॅपची देखील सुविधा असणार आहे. या फोनची किंमत फक्त 2,999 रुपये असणार आहे. मागच्या वर्षी जिओने मिळालेल्या पहिल्या फोनच्या यशानंतर दुसरा फोन लॉन्च करण्याची घोषणा केली होती.

जिओचा पहिला फोन आधी बुकींग करुन खरेदी करायचा होता पण आता हा फोन 15 ऑगस्टपासून तुम्हाला खरेदी करता येणार आहे. 

कशी कराल जिओ फोन 2 ची बुकिंग

- ग्राहकांना जिओच्या आधिकृत वेबसाईटवर जाऊन हा फोन बुक करता येणार आहे. माय जिओ अॅपवर देखील फोन बुक करता येणार आहे.

- वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्टर्डवर क्लिक करा.

- त्यानंतर गेट इट नाऊवर क्लिक करा.

- यानंतर तुमची माहिती भरा.

हा फोन कॅश ऑन डिलेवरीवर उपलब्ध नाही आहे. त्यामुळे आधीच तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत. डेबिट किंवा क्रेडिट कार्डने तुम्ही ऑनलाईन पेमेंट करु शकता.

जिओ फोन 2 चे फीचर्स

- जियो फोन 2 मध्ये 2.4 इंचाचा QVGA डिस्प्ले आहे.

- हा फोन KAI ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

-  या फोनमध्ये 512MB RAM आणि चार जीबी डेटा स्टोर करता येणार आहे. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड टाकून तुम्ही 128 GB पर्यंत वाढवू शकता.

-  या फोनमध्ये 2 मेगापिक्सलचा रेअर कॅमरा आहे.

- फोनमध्ये 2000 एमएएचची बॅटरी आहे.

- हा फोन VoLTE, VoWiFi, Bluetooth आणि FM रेडिओला ही सपोर्ट करतो.

- जिओ फोन 2 मध्ये व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि अनेक सोशल मीडिया अॅप असणार आहे.