जिओ फोनमध्ये १५ ऑगस्टपासून येणार व्हॉट्सअॅप फिचर

 हे अपडेट साधारण २.५ कोटींहून जास्त जिओ फोनमध्ये येणार आहे.

Updated: Aug 13, 2018, 11:40 AM IST
जिओ फोनमध्ये १५ ऑगस्टपासून येणार व्हॉट्सअॅप फिचर title=

नवी दिल्ली : १५ ऑगस्टच्या दिवशी जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅप अपडेट येणार आहे. हे अपडेट साधारण २.५ कोटींहून जास्त जिओ फोनमध्ये येणार आहे. जिओ फोन एक फिचर फोन असून यामध्ये आतापर्यंत जिओ फोनचेच अॅप सुरू असतं. आता व्हॉट्सअॅप आल्याने जिओ फोन युजर्सही अॅण्ड्रॉईड आणि आयओएस डिवाईसवर व्हॉट्सअॅप मेसेज पाठवू शकणार आहे. तुमच्या आवाजानेदेखील जिओ फोनमधील व्हॉट्सअॅप सुरू होऊ शकणार आहे.

काय कराल ?

जेव्हा तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप अपडेट येईल तेव्हा ते डाऊनलोड करा. यानंतर व्हॉट्सअॅप तुमचा नंबर मागेल. तुम्ही तुमचा जिओ मोबाईल नंबर त्यात समाविष्ठ करा. यानंतर तुम्हाला एसएमएसवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचा नंबर वेरिफाई झाल्यानंतर तुम्ही तुमचे प्रोफाईल फोटो सेव्ह करु शकता. 

आवाज रेकॉर्ड 

आता जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरू होईल. आता तुमच्या फ्रेण्ड सर्कलमध्ये व्हॉट्सअॅप नंबर शेअर करु शकता. या फोनमध्ये तुम्ही तुमचा आवाजही रेकॉर्ड करू पाठवू शकता. जेव्हा जिओ फोनवर कोणता व्हॉट्सअॅप मेसेज येईल तेव्हा तुम्हाला अलर्टदेखील दिसेल. १५ ऑगस्टपासून हे अपडेट येणार आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या फोनमध्ये व्हिडिओ कॉलची सुविधा नसणार आहे. या फोनमध्ये व्हॉट्सअॅपवर टाईप करण्यासाठी तुम्हाला अडचण येऊ शकते पण तुम्ही वॉईस मेसेज पाठवू शकता.