How to Stop Spam Calls : spam calls मुळे अनेक स्मार्टफोन यूजर्स त्रस्त झाले आहेत. तुम्हालाही याचा अनुभव कधी तरी आला असेल. हे कॉल्स कोणत्याही बँकेतून किंवा कंपनीतून येतात. आवश्यक कामांवेळीच असे कॉल येत असतात. त्यामुळे अनेकांना नाहक मनस्ताप होतो. अनेक वेळा रागही येतो. खरं म्हणजे, याला ब्लॉक केले जावू शकते. परंतु, अनेक प्रयत्न करूनही याला ब्लॉक केले जात नाहीत. कारण, त्याची योग्य पद्धत अनेकांना माहिती नसते. तुम्ही सुद्धा याला कधी तरी प्रयत्न केला असेल. जर तुमच्याकडे अँड्रॉयड स्मार्टफोन असेल तर तुम्ही स्पॅम कॉलला अवघ्या काही मिनिटात ब्लॉक करू शकता. जाणून घ्या कसं तुम्ही spam calls ब्लॉक करू शकता...
दरम्यान कोणता कॉल स्पॅम आहे हे पाहण्यासाठी Android आणि iOS डिव्हाइसमध्ये पर्याय उपलब्ध आहे. तसेच, त्यांना ब्लॉक करण्याची परवानगी देखील आहे. Google चे फोन अॅप आजकाल बहुतेक Android स्मार्टफोन्सवर डीफॉल्ट कॉलिंग अॅप म्हणून येते. बजेट असो, मिड-रेंज किंवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, स्पॅम कॉल्सचा अनुभव सारखाच असतो. हे कॉल कमी करण्यासाठी आज काही भन्नाट टिप्स शेयर करणार आहो.
वाचा: 'मी साडे चार वर्षांपूर्वी....,'प्राजक्ता माळीचा लव्ह लाईफबाबत मोठा खुलासा