Forbes’ Richest List: 21000 कोटींची मालकीण! सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत असणारी ही भारतीय महिला आहे तरी कोण?

Radha Vembu India third richest woman net worth over Rs 21000 crore: साधी साडी, एका हातात पर्स आणि कपाळावर टीकली या त्यांच्या लूककडे पाहिल्यास त्या एखाद्या सर्वसामान्य भारतीय महिलेप्रमाणाचे वाटतात. मात्र त्या चार कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत.

Updated: Feb 14, 2023, 03:01 PM IST
Forbes’ Richest List: 21000 कोटींची मालकीण! सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत असणारी ही भारतीय महिला आहे तरी कोण? title=
Radha Vembu India third richest woman

Radha Vembu India third richest woman with net worth over Rs 21000 crore: साधी साडी, खांद्यावर पर्स आणि कपळावर टीकली अशा लूकमध्ये त्यांना पाहिल्यास कोणीही ही एखादी सर्वसाधारण महिला आहे असं म्हणले. मात्र या महिलेची संपत्ती 21,000 कोटी (Rs 21000 crore) रुपये आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच धक्का बसेल ना? पण हे खरं आहे. वरील फोटोत दिसणाऱ्या 50 वर्षीय राधा वेम्बू (Radha Vembu) या सध्या भारतामधील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर (India third richest woman) आहेत. स्वत: संपत्ती कमवलेल्या म्हणजेच सेल्फ मेड माहिलांच्या यादीमध्ये राधा या तिसऱ्या स्थानी आहेत. पूर्वी या स्थानावर किरन मुझूमदार-शॉ आणि फाल्गुनी नायर यासारख्या महिला होता.

जागतिक श्रीमंताच्या यादीतही समावेश

राधा यांची एखूण संपत्ती 2.6 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 21 हजार 455 कोटी रुपये इतकी असल्याचा उल्लेख 'फोर्ब्स'च्या 'रियल टाइम रिच'च्या यादीत आहे. राधा या जागतिक स्तरावरील श्रीमंतींच्या यादीमध्ये 1176 व्या स्थानी आहेत. राधा यांची झोहो कॉर्प कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक असून या हिस्सेदारीचाच त्यांच्या संपत्तीचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. झोहो कॉर्प ही एक खासगी आयटी कंपनी असून ती राधा आणि त्यांच्या भावांनी स्थापन केली होती. या कंपनीमधील सर्वात मोठा वाटा हा राधा यांच्या नावावर आहे.

भावांबरोबर स्थापन केली कंपनी

राधा यांचा जन्म 1972 साली झाला. त्यांचे वडील मद्रास हायकोर्टामध्ये स्टेनोग्राफर म्हणून काम करायचे. त्यांनी आयआयटी मद्रासमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी इंडस्ट्रीयल मॅनेजमेंटपर्यंतचं पदवी शिक्षण आयआयटी मद्रासमधून घेतलं. 1996 साली राधा यांनी त्यांचे भाऊ श्रीधर वेम्बू आणि शेखर वेम्बू यांच्या मदतीने अॅडवेन्टनेट नावाने कंपनी सुरु केली. श्रीधर हे या कंपनीचे संस्थापक म्हणून लोकप्रिय आहेत तर शेखर हे पडद्यामधील सर्वात मोठ्या आधारस्तंभांपैकी एक आहे.

अमेरिकेत 375 एकरांवर ऑफिस

राधा या स्वत: 'झोहो मेल्स'च्या प्रोडक्ट मॅनेजर आहेत. त्या 250 जणांची टीम संभाळतात. त्या सध्या चेन्नईमधून काम करतात. झोहोच्या मुख्य कार्यालयांपैकी एक चेन्नईमध्येच आहे. तसेच झोहोचं 375 एकरवर पसरलेलं मुख्यालय अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ऑस्टिन येथे आहे.

व्हॉट्सअपला देणार चॅलेंज

झोहो कंपनीचे एकूण युझर्स हे 6 कोटींच्या आसपासून असून जगातील 9 देशांमध्ये हे युझर्स आहेत. याच कंपनीच्या मालकीची झोनो नावाची कंपनी असून ती क्लाऊड बिझनेस सॉफ्टवेअरमध्ये कार्यरत आहे. सध्या ही कंपनी व्हॉट्सअपला आव्हान देणाऱ्या 'अरत्ताई' या सॉफ्टवेअरच्या बीटा व्हर्जनची टेस्टींग करत आहे. 'अरत्ताई'चा तमिळ भाषेतील अर्थ संवाद असा होतो.

या कंपन्यांमध्येही राधा डायरेक्टर

राधा या जानकी हाय-टेक अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कृषी आधारित एनजीओमधील डारेक्टरही आहेत. तसेच रियल इस्टेट क्षेत्रातील हायलॅण्ड व्हॅली कॉर्परेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्येही राधा या डायरेक्टर आहेत. राधा या विवाहीत असून त्यांना एक मुलगा आहे.