'या' पद्धतीने तुम्ही कोणत्याही स्मार्टफोनचे लॉक ओपन करु शकता!

तुम्ही जर तुमच्या मोबाईलचे पॅटन लॉक विसरले असाल तर चिंता करू नका. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 23, 2017, 03:57 PM IST
'या' पद्धतीने तुम्ही कोणत्याही स्मार्टफोनचे लॉक ओपन करु शकता! title=

नवी दिल्ली : तुम्ही जर तुमच्या मोबाईलचे पॅटन लॉक विसरले असाल तर चिंता करू नका. हे लॉक ओपन करण्यासाठी एक उपाय आहे. या खास ट्रिकने तुम्ही तुमचाच नाही तर कोणाचाही मोबाईल अनलॉक करू शकता. जाणून घेऊया ही खास ट्रिक...

स्टेप १ : सर्वात आधी फोनच्या सेटींगमध्ये जा.

स्टेप २ : यात Apps वर टॅप करा.

स्टेप ३ : त्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रिनवर अॅप्सची लिस्ट येईल. यात असे अॅ्प निवडा ज्याच्या मदतीने तुम्ही अॅप लॉक करता. CM Security app सिलेक्ट करा.

स्टेप ४ : त्यानंतर एक विंडो ओपन होईल. यात Force Stop वर क्लिक करा.

स्टेप ५ : असे करताच तुम्हाला misbehave चा मेसेज येईल. ते ओके करा.

स्टेप ६ : यानंतर अॅप काम करणे बंद करेल. यानंतर तुम्ही व्हॉट्स अॅप, फेसबूक किंवा गॅलरी अगदी सहज ओपन करू शकता.