होंडाची नवीन धमाकेदार गोल्ड विंग बाईक लॉन्च, बुकिंग सुरु

2018 Honda Gold Wing ने टोक्यो मोटार शोमध्ये ग्लोबल डेब्यू केलं होतं. आता एचएमएसआय म्हणजे होंडा मोटारसायकल अ‍ॅण्ड स्कूटर इंडियाने घोषणा केली आहे.

Updated: Dec 5, 2017, 07:20 PM IST
होंडाची नवीन धमाकेदार गोल्ड विंग बाईक लॉन्च, बुकिंग सुरु title=

नवी दिल्ली : 2018 Honda Gold Wing ने टोक्यो मोटार शोमध्ये ग्लोबल डेब्यू केलं होतं. आता एचएमएसआय म्हणजे होंडा मोटारसायकल अ‍ॅण्ड स्कूटर इंडियाने घोषणा केली आहे की, या फ्लॅगशिप टुअरर बाईकची बुकिंग सुरू झाली आहे. 2018 Honda Gold Wing या बाईकची खासियत जाणून घेऊया....

इंजिन आणि पावर

2018 Gold Wing मध्ये १,८३३ सीसीचं इंजिन देण्यात आलंय. हे इंइन ५,५०० आरपीएमवर १२५ बीएचपीची पावर जनरेट करतं. ४,५०० आरपीएमवर हे इंजिन १७० न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. इंजिनला ७ स्पीड ट्रान्समिशन सिस्टम देण्यात आली आहे. 

आधुनिक तंत्रज्ञान

या बाईकमध्ये चार रायडिंग मोड्स, टुअर, स्पॉर्ट, इकॉन आणि रेन दिले गेले आहेत. होंडाच्या या इंजिनला ७ स्पीड ड्यूल क्लच ट्रान्समिशन सिस्टम देण्यात आलंय. तसेच बाईकमध्ये रिव्हर्स आणि वॉकिंग मोड सुद्धा दिलं गेलंय. याच्या मदतीने बाईकला टाईट पार्किंग स्पेसमध्येही सोप्या पद्धतीने पार्क करता येईल. 

या बाईकच्या हॅडलबार्सच्या छोट्या डॅशवर लावण्यात आलेल्या ७ इंचाच्या एलसीडी स्क्रीनवर रायडर कार प्ले फिचर देण्यात आलंय. रायडरला बाईकच्या ट्रंकमध्ये स्टोरेज कंपार्टमेंटमध्ये यूएसबीच्या मदतीने तुम्हाला तुमच्या आयफोनमध्ये प्लग करावं लागेल. त्यानंतर ब्ल्यूटूथ हेडसेटला कनेक्ट करावं लागेल. कार प्ले फिचर जसं कारमध्ये काम करतं तसंच हे बाईकमध्ये काम करेल. 

फिचर्स 

या बाईकमध्ये किलेस इग्निशन, हिटेड ग्रीप्स, सीट, ऑडिओ आणि फोन कनेक्टिव्हीटी, क्रूज कंट्रोल, सॅटेलाईट नॅव्हिगेशन, सेमी अ‍ॅक्टीव्ह सस्पेन्शन इत्यादी फिचर्स देण्यात आले आहेत. 

या बाईकचे दोन व्हेरिएंट

होंडा या बाईकचे दोन व्हेरिएंट आणत आहेत. स्टॅंडर्ड आणि गोल्ड विंग टुअर यांचा त्यात समावेश आहे. या बाईकची बुकिंग नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये सुरू झाली आहे. तर या बाईकची डिलिव्हरी जानेवारी २०१८ मध्ये सुरू होईल. 

किती असेल या बाईकची किंमत?

नवीन 2018 Honda Gold Wing या बाईकची नवी दिल्लीतील एक्स शोरूम किंमत २६.८५ लाख रूपये ठेवण्यात आली आहे. भारतात या बाईकची स्पर्धा इंडियन रोडमास्टर, हार्ले डेव्हिडसन सीव्हिओ लिमिटेड बाईकसोबत होईल.