कारमध्ये हा बदल करा आणि मिळवा ४ हजारांचा कॅशबॅक !

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे.

Updated: Dec 13, 2018, 06:55 PM IST
कारमध्ये हा बदल करा आणि मिळवा ४ हजारांचा कॅशबॅक ! title=

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनात होणारी वाढ प्रदूषणात भर घालण्याचे काम करीत आहे. प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार अनेक उपाय योजनांवर जोर देत आहे. त्याचबरोबर ऑटो कंपन्यादेखील सरकारला पाठिंबा देत इलेक्ट्रिक वाहन आणि सीएनजी वाहन निर्मितीवर लक्ष केंद्रित करत आहे. दिल्लीतील रस्त्यावरील प्रदूषण कमी करण्यासाठी इद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (आयजीएल) कंपनीने अनोखा प्रयोग केला आहे. आयजीएलकडून पेट्रोलवरील वाहनाला सीएनजीमध्ये बदलून घेणाऱ्या ग्राहकाला विशेष सूट देण्यात येणार आहे.

 

आयजीएलची योजना 

सीएनजी वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयजीएलकडून आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. यासाठी ग्राहकांना त्यांच्या वाहनात सीएनजी किट लावून घेणे गरजेचे आहे. सीएनजी किट लावल्यानंतर ग्राहकांना आरसी प्रतसह टेस्टिंग सर्टिफिकेट द्यावे

लागणार आहे. ही प्रक्रियापूर्ण झाल्यानंतर आयजीएलतर्फे ग्राहकांना २ हजार रुपयांचे प्री-लोड स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अॅपच्या आधारित टॅक्सी कंपनीचे कूपन मिळणार आहे. २ हजार रुपयांच्या स्मार्टकार्डमधून ग्राहक त्यांच्या

वाहनात सीएनजी भरु शकतात. आरसी प्रत आणि वैध हायड्रो चाचणी प्रमाणपत्र दिल्ली-एनसीआरच्या सीएनजी पंपावर जमा केले जाईल. ही योजना १ डिसेंबर २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ पर्यंत लागू आहे. तसेच ही सुविधा दिल्लीतील ११ सीएनजी

स्थानकावर सुरु करण्यात आली आहे.