मुंबई : स्मार्टफोन प्रत्येकाच्या गरजेचा भाग झाला आहे. स्मार्टफोनच्या दुनियेत सध्या वन प्लसच्या मोबाईलची चलती आहे. ग्राहकांसाठी वन प्लसने नवा मोबाईल लॉन्च केला आहे. बहुप्रतिक्षित असलेला वन प्लस 6-टी या मोबाईलची मॅक्लारेन एडिशन खुली करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी कंपनीच्या ५व्या वर्धापनादिनानिमित्ताने या एडीशनची सुरुवात करण्यात आली. हा मोबाईल १५ डिसेंबरपासून ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाईट्सवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या मोबाईलचं वैशिष्ट्य म्हणजे या मोबाईलचा रॅम २ किंवा ४ जीबी नसून, तब्बल १० जीबी इतका आहे.
१० जीबी रॅम असलेला या मोबाईलचा स्टोअरेज २५६ जीबी इतके आहे. तर याची किंमत ५० हजार ९९९ रुपये इतकी आहे. हा मोबाईल या कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात महागडा मोबाईल ठरला आहे. मोबाईल महाग जरी असला तरी ग्राहकांसाठी अनेक ऑफर आणि डिस्काउंटची घोषणा कंपनीने वर्धापनदिनी केली आहे.
Immerse yourself in power and speed. Inspired to Never Settle, we bring you the #OnePlus6T McLaren Edition. #SalutetoSpeed pic.twitter.com/cCE7tRirfB
— OnePlus India (@OnePlus_IN) 12 December 2018
वन प्लस 6 टी मॅक्लारेन हा मोबाईल कंपनीच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त वितरित होत आहे. हा मोबईल खरेदी करताना अनेक ऑफर्सचा १५ ते २४ डिसेंबरदरम्यान फायदा घेता येईल. हा स्मार्टफोन वन प्लस कंपनीच्या इतर मोबाईलप्रमाणे अॅमेझॉन एक्सक्लुझिव्हवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. अॅक्सिस बॅंकेच्या कार्डचा वापर केल्यास सर्व ईएमआय व्यवहारावर २ हजार रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे. अतिरिक्त ईएमआय न देता मोबाईल घेण्याची देखील सोय आहे. पण ही ऑफर फक्त सहा महिन्यांसाठीच आहे.
याशिवाय ग्राहकांना जुन्या वनप्लस मोबाईलच्या बदल्यात ३ हजारांपर्यंत सवलत मिळू शकते. तर इतर कोणत्याही कंपनीच्या मोबाईलच्या बदलात २ हजारापर्यंत कंपनी सवलत देणार आहे. ही ऑफर ऑनलाईन उपलब्ध आहे.
या मोबाईलचा रॅम १० जीबी इतका आहे. हा मोबाईल पपई ऑरेंज आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. या मोबाईलला फक्त २० मिनिटे चार्ज केल्यास दिवसभर चालेल असा दावा कंपनीने केला आहे. नव्या मोबाईलमध्ये फास्ट चार्जिंग टेक्नॉलजी Warp Charge 30 चा वापर केला आहे. या स्मार्टफोनची स्क्रिन 6.4 इंच एफएचडी इतकी आहे. तर या मोबाईलची स्क्रिन वॉटरप्रूफ आहे. मोबाईलचं प्रोसेसर 845 स्नॅपड्रॅगन आहे. तर 3,700 एमएच इतक्या पॉवरची बॅटरी आहे. तसेच या मोबाईलची इंटरनल स्टोअरेज 256 जीबी इतकी आहे. यात मेमरी कार्ड सपोर्ट करणार नाही. मोबाईलला १६ मेगापिक्सल + २० मेगापिक्सल असे दोन रिअर कॅमेरे आहेत. तर २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहेत. हा मोबाईल 'OxygenOS' आणि 'Android 9 Pie' या व्हर्जनवर आधारित आहे.