WhatsApp च्या 5 नवीन फीचर्समुळे चॅटिंग आणखी मजेदार

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूझर्साठी सतत नवनवीन फीचर्स लाँन्च करत असतो.

Updated: May 3, 2021, 04:57 PM IST
WhatsApp च्या 5 नवीन फीचर्समुळे चॅटिंग आणखी मजेदार title=

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूझर्साठी सतत नवनवीन फीचर्स लाँन्च करत असतो. आता आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या अशाच काही फीचर्सविषयी सांगणार आहोत जे खूप मजेदार आणि फायदेशीर आहे आणि ते फीचर्स लवकरच बाजारात येऊ शकतात.

24 तासात Disappearing Messages फीचर

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर Disappearing Messages फीचर सात दिवसांसाठी अ‍ॅक्टिव्ह आहे. ते चालू केल्यानंतर, पाठवलेला संदेश आणि फोटो 7 दिवसात डीलिट केला जातो. परंतु कंपनी आता 24 तासांच्या Disappearing Messages फीचरवर काम करत आहे. ज्यामुळे कोणालाही पाठवलेला संदेश आता सात दिवसांऐवजी 24 तासात डीलिट केला जावू शकतो. त्यात 7 दिवस किंवा 24 तास असा स्विच करण्यासाठी टॉगल असेल.

Read Later फीचरसह गोष्टी अधिक सुलभ

जर आपण सध्याच्या फीचरबद्दल बोललो तर आपण आपल्या महत्वाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे संग्रहण करु शकतो आणि ते आर्काइव्ह करुन लोकांच्या नजरेतून लपवू शकतो. व्हॉट्सअ‍ॅपचे Read Later फीचरसुद्धा असेच असेल आणि यात युजर कोणत्याही चॅटला Read Laterमध्ये पाठवू शकतो आणि त्यानंतर त्या चॅटमधील नवीन मेसेजची नोटिफिकेशन स्क्रीनवर दिसणार नाही आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार तो चॅट वाचू शकता. परंतु जेव्हा आर्काइव्ह चॅटमध्ये तुम्हाला संदेश प्राप्त होतो, तेव्हा तो संदेश तुम्हाला दिसणे सुरू होते. त्यामुळे Read Later फीचरमध्ये तुम्हाला एक चांगले आणि कामाचे फीचर मिळणार आहे.

Multi-Device Support मुळे टेन्शन कमी

लोकं या Multi-Device सुविधेची आतुरतेने वाट पाहत आहेत. या फीचरमुळे आपण एकाच वेळी आपले व्हॉट्सअ‍ॅप खाते वेगवेगळ्या डिव्हाइसवर चालवू शकतो. त्यासाठी मुख्य डिव्हाइसमध्ये इंटरनेट सुरु ठेवण्याची आवश्यकता नाही.

सध्या तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या मदतीने दुसऱ्या डिव्हाइसमध्ये आपले खाते चालवू शकता, परंतु त्यातील एक सर्वात कठीण गोष्ट ही आहे की, तुमच्या मुख्य डिव्हाइसमध्ये इंटरनेट असणे गरजेचे आहे अन्यथा ते खाते चालणार नाही.

Join Missed Calls वरून कॉल करणे अधिक मजेदार

सध्याच्या परिस्थितीत जर आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप कॉल आला आणि आपण तो Missed केला तर, आपण त्यात सामील होऊ शकत नाही. परंतु लवकरच व्हॉट्सअ‍ॅप आपल्याला एक असे फीचर देणार आहे, ज्यात आपण Missed झाल्यावर सुद्धा पुन्हा ग्रुप कॉलमध्ये सामील होऊ शकता. यामधील एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जर कॉल सुरु असेल तरच आपण त्यामध्ये सामील होऊ शकता. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप उघडताच यूझर्सना स्क्रीनवर एक नोटिफिकेशन मिळेल.

Instagram Reels चे फीचर व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध

अहवालानुसार फेसबुक लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्या फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामचा रील फीचर आणणार आहे. हे फीचर सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे, ते कधी सादर केले जाईल याबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. परंतु या फीचरमुळे यूझर्स व्हॉट्सअ‍ॅपवर सहजपणे रीलच्या व्हिडीओंचा आनंद घेऊ शकतो.