नवी दिल्ली : ई कॉमर्स वेबसाईट्सवर सध्या फेस्टिव्हल शॉपिंगला सुरुवात झालीय. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या मोठमोठ्या ऑफर्स देतायत. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डीलला आजपासून सुरुवात झालीय. अमेझॉनच्या प्राईम मेंबर्ससाठी आजपासून द ग्रेट इंडीयन फेस्टिव्हल सुरु झालाय. इतर ग्राहकांना उद्यापासून याचा फायदा मिळणार आहे.
तुमच्याकडे एचडीएफसी किंवा एसबीआयचे क्रेडीट, डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला यामध्ये जास्त सवलत मिळू शकणार आहे. खरेदी करुन एचडीएफसीने पेमेंट करणार असाल तर अमेझॉन तुम्हाला मोठा डिस्काऊंट देईल. फ्लिपकार्ट एसबीआयच्या क्रेडीट कार्डवर तर अमेझॉन एचडीएफसीच्या डेबिट कार्डवर १० टक्के डिस्काऊंट देतेय. फ्लिपकार्टने सेलसाठी पेटीएमसोबत देखील करार केलाय.
एपलने काही दिवसांपुर्वी आयफोन १२ लॉन्च केला. त्यामुळे दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये आयफोनच्या मॉडेल्सवर सूट मिळतेय. अमेझॉनवर ५४,९०० वाला आयफोन ११ डिस्काऊंटनंतर ४७ हजार ९९९ रुपये असेल. तर फ्लिपकार्ट आयफोन ११ प्रो वर २६ हजार ६०० पर्यंतचा डिस्काऊंट देत आहे.
सॅमसंग, रिअलमी,रेडमी, पोको, व्हिओ आणि मोटोरोला सारख्या स्मार्टफोनवर मोठे डिस्काऊंट सुरु आहेत. अमेझॉन स्मार्टफोनवर ४० टक्के आणि ६ हजारपर्यंत एक्सचेंज ऑफर देतोय. अमेझॉन वन प्लस ८ च्या ६ जीबी आणि १२८ जीबी वर साधारण ५ हजारपर्यंत डिस्काऊंट देतोय. सॅमसंग गॅलेक्सी एस१० वर ३४ हजार पर्यंत डिस्काऊंट मिळेल. या सर्वांवर नो कॉस्ट ईएमआयची सुविधा देखील असेल.
अमेझॉनवर एक्स्ट्रा कॅशबॅकसोबत टीव्ही आणि इतर इलेक्ट्रीक वस्तूंवर ७५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळतेय. नो कॉस्ट ईएमआय २९१ रुपयांपासून सुरु होतेय. या प्रोडक्टवर १ वर्षांची एक्सटेंडेट वॉरंटी ९९ रुपयांपासून सुरु होतेय. ५० इंचचा टीव्ही १८ हजार ९९ रुपयांपासून मिळतोय. तर स्मार्ट टीव्ही ८ हजार ९९९ रुपयांपासून सुरु होतोय. टीव्हीवर नो कॉस्ट ईएमआय ८३३ रुपयांपासून सुरु आहे. अमेझॉनकडून लॅपटॉपवर ३० हजार रुपये आणि गेमिंग लॅपटॉपवर ३५ हजार पर्यंत सवलत मिळतेय.
ई कॉमर्सच्या फेस्टिव्हलमध्ये ५० लाखाहून अधिक फॅशन स्टोर्सवर ८० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळतंय. यावेळेस ई कॉमर्स कंपन्यांनी कपड्यांवर विशेष लक्ष दिलंय. फ्लिपकार्टने सणाच्या काळात १०० हून अधिक ब्राण्डसोबत पार्टनरशिप केली. त्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवर २ हजार फॅशन स्टोर आणलेय.