मुंबई : समाज माध्यमांपैकी एक ट्विटर. ट्विटर चक्क डाऊन झाल्याने याचा फटका अनेक युजर्सला बसला. तसेच #Twitterdown हा ट्रेंड झाल्याचे पाहायला मिळाले. जगभरातील कोट्यवधी युजर्सनी ट्विटर डाऊन झाल्याचे सांगत ट्विट केले. त्यामुळे #Twitterdown हा ट्रेंड झाला.
मायक्रोब्लॉगिंग साईट अशी ओळख असणारे ट्विटर डाऊन झाल्याच्या अनेक तक्रारी केल्या आहेत. ट्विटर डाऊन झाल्याने अनेक युजर्सना आपल्या ट्विटर अकाऊंटवरील अपडेट दिसत नसल्याचे दिसूून आले आणि त्यांनी तक्रार सुरु करण्यास सुरुवात केली. दरम्यान, ट्विटरकडूनही याला दुजोरा देण्यात आला आहे. आपली सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Twitter has been down for many of you and we’re working to get it back up and running for everyone. We had some trouble with our internal systems and don’t have any evidence of a security breach or hack: Twitter Support pic.twitter.com/IAifUpVRVN
— ANI (@ANI) October 16, 2020
दरम्यान, आपल्याला अनेक लोकांसाठी ट्विटर डाल्याचे सांगितले. आम्ही ट्विटर परत मिळवून देण्यासाठी आणि प्रत्येकाची अडचण दूर करण्याच्या प्रयत्नात आहोत. आम्हाला आमच्या अंतर्गत सिस्टीममध्ये थोडा काही तांत्रिक बिघाड झाला
त्यामुळे हे झाले आहे. आम्ही कोणत्याही सुरक्षेचे उल्लंघन झालेले नाही किंवा हॅक झाल्याचा पुरावा नाही, असे ट्विटरने डाऊनबाबत स्पष्टीकरण करताना दावा केला आहे.