मुंबई : पेटीएमद्वारे (Paytm) मोबाईल रिचार्ज (Mobile Recharge) करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पेटीएमने आपल्या माध्यमातून होणाऱ्या मोबाईल रिचार्जसाठी अधिभार (Surcharge) आकारण्यास सुरुवात केली आहे. रिचार्जच्या रकमेनुसार ही रक्कम आकारण्यात येणार आहे. अधिभार हा रिचार्जच्या रक्कमेनुसार ठरवण्यात येणार आहे. तसेच अधिभार हा 1 ते 6 रुपयांपर्यंत असणार आहे. (extra charge will have to be paid for mobile recharge from paytm)
हे सर्व पेटीएम मोबाईल रिचार्जवर लागू होईल. पेमेंटची पद्धत पेटीएम वॉलेट किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) किंवा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असू शकते. या सर्वांवर अधिभार लागू होईल. सध्या हे अपडेट सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. गेल्या वर्षी Paytm च्या प्रतिस्पर्धी PhonePe ने मोबाईल रिचार्जवर सरचार्जची आकारण्याची सुरुवात केली होती.
पेटीएमने मोबाईल रिचार्जवर अधिभार आकारण्यास सुरुवात केल्याचं अनेकांनी ट्विटद्वारे म्हटलंय. युजर्सना हे अपडेट मार्चच्या अखेरीस मिळू लागलं. मात्र, आता हे अपडेट मोठ्या संख्येने यूझर्ससाठी उपलब्ध झालंय.
रिपोर्ट्सनुसार, पेटीएमद्वारे 100 रुपयांपेक्षा जास्तच्या रिचार्जवर अधिभार आकारत आहे. कंपनी किमान 1 रुपये आणि कमाल 6 रुपये घेत आहे. UPI आणि वॉलेट वापरून रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही व्यवहार शुल्क आकारत नसल्याचं पेटीएमने 2019 मध्ये सांगितलं होतं. मात्र, रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच सर्व यूझर्सकडून मोबाईल रिचार्जवर शुल्क आकारणं सुरू करू शकते.
Paytm प्रमाणे PhonePe ने ऑक्टोबरमध्ये अधिभार आकारण्यास सुरुवात केली. फोनपे 50 रुपयांपेक्षा जास्त मोबाईल रिचार्जसाठी ग्राहकांकडून अधिभार आकारत आहे.